रेशन-पेट्रोल बंद झाल्यावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा, औरंगाबादेत आरोग्य केंद्रांवर गर्दी

जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीच्या सूचना काढल्यानंतर नागरिकांमध्ये जनजागृती व्हायला सुरुवात झाली आहे. येत्या काही काळात लसीकरणासाठी केंद्रावर जास्तीत जास्त नागरिक येतील, अशी आशा आहे.

रेशन-पेट्रोल बंद झाल्यावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा, औरंगाबादेत आरोग्य केंद्रांवर गर्दी
शहरातील जवाहर कॉलनी आरोग्यकेंद्रावरील लसीकरण
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 5:08 PM

औरंगाबादः कोरोना प्रतिबंधक लसीकरणात (Corona Vaccination) औरंगाबाद जिल्हा लक्षणीय प्रमाणात मागे राहिल्याने जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनाने कालपासून शहर व जिल्ह्यात सक्तीची नियमावली लागू केली आहे. लसीचे प्रमाणपत्र नसलेल्यांना रेशन, पेट्रोल, प्रवास, आरोग्यसेवा, हॉटेलिंग आदी सर्व सेवा मिळणार नाहीत. तसेच कोणत्याही प्रशासकीय कार्यालयात (Administrative office) अशा व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटन स्थळांवरही लसीचे प्रमाणपत्र अनिवार्य असल्याची नियमावली जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली होती. एकाच दिवसात या नियमाचा चांगला परिणाम दिसून आला. एवढे दिवस रिकामे भासणाऱ्या लसीकरण केंद्रांवर आता नागरिकांच्या रांगा दिसू लागल्या.

क्रांती चौक, जवाहर कॉलनी केंद्रावर गर्दी

शहरातील क्रांती चौकातील आरोग्य केंद्रावर मंगळवारी 90 जणांचे लसीकरण झाले. या ठिकाणी बुधवारी दुपारपर्यंत 120 नागरिकांचे लसीकरण झाले होते. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची ही संख्या जास्त होती, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरज्योती शिंदे यांनी सांगितले. तर जवाहर कॉलनी आरोग्य केंद्रावरदेखील दिवसभरात 122 जणांचे लसीकरण झाले. दुपारनंतरही येथे नागरिकांची लांब रांग लागली होती.

आगामी काळात लसीकरण वाढेल

जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीच्या सूचना काढल्यानंतर नागरिकांमध्ये जनजागृती व्हायला सुरुवात झाली आहे. येत्या काही काळात लसीकरणासाठी केंद्रावर जास्तीत जास्त नागरिक येतील, अशी आशा आहे. सध्या शहरात लसीचा पुरेसा साठा आहे. तसेच लसीकरणासाठी आवश्यक मनुष्यबळाचाही कोणताही प्रश्न नाही. शहरात लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली असून महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार, आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

इतर बातम्या-

औरंगाबादध्ये ED चे छापेः विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे पद्माकर मुळे यांच्याविरोधात कारवाई, मलिक-वानखेडे लढाईचे पडसाद?

Politics: औरंगाबादेत राजकीय गरमागरमी, शिवसेना-भाजपचे एकमेकांवर आरोप करत आंदोलन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.