प्रतिक्षा संपली! ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्ट लवकरच होणार लाँच
नव्या चाकांसाठी नवी डिझाईन करण्यात आली असून त्याचा फायदा अधिक ग्राहकांना होईल. पंरतु आतमध्ये अधिक बदल असेल असं वाटतं नाही. पण इतर गाड्यांपेक्षा ह्युंदाई वेन्यू गाडीत अधिक पर्याय असतील.
मुंबई – भारतात सणासुदीच्या दरम्यान प्रत्येकवेळी अनेक कंपनीच्या नवीन गाड्या (New car) बाजारात (market) येतात, त्यामुळे प्रत्येक गाडीविषयी अनेकांना कुतूहल असतं असं आपण समजूया. कारण अनेकदा नवी गाडी आवडल्याने जुनी गाडी बदल करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातही कंपनीकडून तुम्हाला डिस्काऊंट दिलं जातं त्यांमुळे आकर्षक किंमतीत तुम्हाला नवीन गाडी चालवायला मिळते. अनेक दिवसांपासुन तुम्ही वाट पाहत असलेल्या ह्युंदाई वेन्यू (hyundai venue) गाडीची प्रतिक्षा लवकरचं संपणार असल्याची चिन्ह आहेत, कारण ह्युंदाई गाडीची रस्त्यावरील चाचणी सुरू असल्याचं वृत्त आहे, त्यामुळे तुम्हाला ह्युंदाई वेन्यू तुम्हाला कधीही रस्त्यावर दिसू शकते. विशेष म्हणजे गेल्यावर्षी ऑक्टोबर (October) महिन्यात या गाडीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हापासून चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली होती. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता लवकरचं पुर्ण होईल. पूर्वी हे वाहन दक्षिण कोरियामध्ये चाचणी सुरू असताना आढळलं होतं. तसेच भारतामध्ये सुध्दा हे वाहन चेन्नईतील एका प्रकल्पाजवळ हेरले गेले आहे.
ह्युंदाई वेन्यू गाडीत अधिक पर्याय
मिडलाइफ रिफ्रेशसह ह्युंदाई वेन्यू ही अधिक ठळक दिसण्याची शक्यता आहे. तसेच आपण पाहत असलेल्या फोटोमध्ये हे स्रष्ट होतंय की अद्ययावत एसयूव्हीला नवीन अलॉय व्हील आणि विविध टेललाइट्स आहेत. तसेच येणा-या गाडीमध्ये अनेक बदल असून ती लोकांच्या पसंतीला अधिक कशी उतरेल अशा पध्दतीने कंपनीने तयार केली आहे. इतर गाड्यांप्रमाणे याही गाडीत अनेक बदल पाहायला मिळतील. आपण फोटो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतंय की, प्रत्येक गोष्टीत बदल झाला आहे. पुढचा हेडलॅम्पची डिझाईन सुध्दा वेगळ्या पध्दतीची आहे. नव्या चाकांसाठी नवी डिझाईन करण्यात आली असून त्याचा फायदा अधिक ग्राहकांना होईल. पंरतु आतमध्ये अधिक बदल असेल असं वाटतं नाही. पण इतर गाड्यांपेक्षा ह्युंदाई वेन्यू गाडीत अधिक पर्याय असतील.
गाड्यांचे पर्याय
भारताच्या बाजारपेठेत हे वाहन सध्या तीन इंजिन पर्यायासह उपलब्ध आहे. पहिले वाहन 1.2-लिटर NA पेट्रोल युनिट (83 PS/114 Nm) आहे. जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनला मिळते. दुसरे म्हणजे 1.5-लिटर टर्बो-डिझेल युनिट (100 PS/240 Nm), 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. तिसरे 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल मोटर (120 PS/172 Nm), जी 6 – स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, 6 – स्पीड iMT, किंवा 7- स्पीड DCT सह असू शकते. ह्युंदाई वेन्यूची तीन पध्दतीच्या गाड्या सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, आगामी ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्टचे येत्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर पदार्पण होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरीपूर्वी भारतात लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. तसेच मारुती विटारा ब्रेझा, किया सोनेट, टाटा नेक्सॉन, निसान मॅग्नाइट, इत्यादी गाड्यांनी ती टक्कर देत राहील.