कोरोनामुळे हेही घडतंय, कोरोना लसचा फॉर्म्युला चोरीला जाण्याची भीती, गुप्तहेर संशोधनाच्या मागावर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनेक अचंबित करणाऱ्या घटना घडत आहेत. याच घटनांचा घेतलेला एक आढावा (Corona Effect in World).

कोरोनामुळे हेही घडतंय, कोरोना लसचा फॉर्म्युला चोरीला जाण्याची भीती, गुप्तहेर संशोधनाच्या मागावर
Follow us
| Updated on: May 02, 2020 | 2:09 AM

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरुच आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच इतरही अनेक मोठे बदल जगभरात पाहायला मिळत आहेत. एकूणच जगभरात उलथापालथ झाल्याचं दिसत आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. काही देशांनी वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरात अनेक अचंबित करणाऱ्या घटना घडत आहेत. याच घटनांचा घेतलेला एक आढावा (Corona Effect in World).

1. पोलिसांना चकवा देण्यासाठी एका जोडप्यानं चक्क बाहुलीला आपलं बाळ बनवून टाकलं. ते बाळ आजारी असल्याचं सांगून चेकपोस्ट ओलांडण्याचा प्रयत्न केला. विशाखापट्टनच्या परिसरात ही घटना घडली. पहिल्या चेकपोस्टरवर जोडप्यानं बाळ आजारी असल्याचं सांगितल्यामुळे पोलिसांनी सोडून दिलं. बाहुलीला कपडे आणि कापडानं झाकलेलं होतं. त्यामुळे पोलिसांना संशय आला नाही. मात्र दुसऱ्या चेकपोस्टवर पोलिसांना संशय आल्यानं सर्व बेत फसला. एका आजारी नातलगांना पाहायला जाण्यासाठी हा बनाव रचल्याची कबुली जोडप्यानं दिली. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

2. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात एकही कार विकली गेलेली नाहीय. देशातली सर्वात मोठी कंपनी मारुती-सुझूकी, मर्सिडीज, स्कोडा या सर्वच कंपन्याची एकसारखीच स्थिती आहे. एका माहितीनुसार देशातल्या ऑटो मोबाईल सेक्टरवर तब्बल 4 कोटी लोकांचा रोजगार अवलंबून आहे. देशाच्या जीडीपीत ऑटो मोबाईल सेक्टरचा हिस्सा 8 टक्के, तर सरकारच्या टॅक्स संकलनातला हिस्सा हा 15 टक्के इतका आहे. मात्र लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा उत्पादकांना आहे. इंडियन ऑटोमोबाइल इंडस्ट्रीच्या एका रिपोर्टच्या हवाल्यानं दैनिक भास्करनं ही बातमी दिलीय.

3. अमेरिकेबरोबरच अनेक देशांना कोरोना व्हॅक्सिनचा फॉर्म्युला आता चोरीला जाण्याची भीती आहे. अनेक देशांच्या गुप्तचर संस्था या इतर देशांमध्ये सुरु असलेल्या कोरोनाच्या लसीच्या संशोधनावर नजर ठेवून असल्याची माहिती आहे. बीबीसीला एका आधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार सायबर हेर हे 24 तास कोरोना लसीच्या घडामोडींवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे जिथं कोरोनावर संशोधन सुरु आहे, त्या संस्थांना अलर्ट केलं गेलंय. ज्या देशाला पहिल्यांदा यश येईल, तो देश सर्वात आधी स्वतःच्या लोकांसाठी लसीचं उत्पादन करेल. मात्र त्याचवेळी इतरांनाही त्याचा फॉर्म्युला कळावा, म्हणून हेरगिरी सुरु असल्याचं सांगितलं जातंय.

4. लॉकडाऊन हटवा या मागणीसाठी अमेरिकेतल्या मिशिगनमधले लोक चक्क बंदुका घेऊन रस्त्यांवर उतरले. तिथल्या एका प्रशासकीय इमारतीत सुद्धा त्यांनी शिरण्याचा प्रयत्न केला. या लोकांच्या हातात फक्त बंदूकाच नव्हे तर, काहींकडे बुलेटप्रुफ जॅकेटसुद्धा होतं. मिशिगनमध्ये सुरु असलेलं लॉकडाऊन हटवण्याची मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. आंदोलकांपैकी अनेकांच्या चेहऱ्यावर साधे मास्क सुद्धा नव्हते. तर अनेकांनी आंदोलनात कोणतंही शारिरीक अंतर सुद्धा पाळलं नाही.

5. बिजिंगमधलं सुप्रसिद्ध फूड मार्केट पुन्हा सुरु करण्यात आलंय. विंचू आणि असंख्य किडे इथं फ्राय करुन विकले आणि खाल्ले जातात. मागच्या दोन महिन्यांपासून हे मार्केट बंद होतं. मात्र आता ते पुन्हा सुरु करण्यात आलंय. समुद्रातले असंख्य प्राणी, ऑक्टोपस आणि इतर अनेक गोष्टी इथं विक्रीला असतात. जोग्शान फूड मार्केट असं या बाजाराचं नाव आहे. कोरोनापासून खबरदारी म्हणून सध्या दिवसाला फक्त 3 हजार लोकांना प्रवेश दिला जातोय. डेली मेलच्या माहितीनुसार हा बाजार फक्त संध्याकाळीच भरतो. मात्र जगात कुठेच मिळत नाही, असे प्राणी आणि किटक इथं खायला मिळतात.

6. संयुक्त राष्ट्राची मान्यता प्राप्त असलेल्या 247 देशांपैकी 215 देशांमध्ये कोरोना पोहोचला आहे. मात्र 32 देश असेही आहेत, जिथं अजूनही कोरोना पोहोचलेला नाही. या 32 देशांच्या यादीत फक्त उत्तर कोरिया हा आकडा लपवत असल्याची शंका आहे. मात्र इतर 31 देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत. ज्या 32 देशांमध्ये कोरोना पोहोचलेला नाही, त्यापैकी 10 पेक्षा जास्त देशांची लोकसंख्या ही अत्यंत कमी आहे. कोकोस आईलँड सारख्या 5 देशांची लोकसंख्या तर 50 हजारांच्या आत आहे.

7. सरकारी आकड्यांवर विसंबून राहणं ब्रिटनला चांगलचं भोवल्याचं समोर आलंय. अनेक दिवसांपर्यंत काही प्रमुख हॉस्पिटलमधलेच आकडे ग्राह्य धरले जात होते. मात्र आता इतर अनेक केअर होममधल्या मृतांचा आकडा समाविष्ठ केला गेलाय. एका माहितीनुसार जेव्हा ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा हा 11 सांगितला जात होता. तेव्हा एका फेस्टिव्हलसाठी हजारो लोक एकत्र जमले होते. आकडा कमी असल्यामुळे लोकांमध्ये गांभीर्य नव्हतं. मात्र त्यावेळीच खरा मृतांचा आकडा हा 11 नसून 51 असल्याचं आता समोर आलंय.

8. लॉकडाऊनच्या काळात रेल्वे बंद असली तरी रेल्वे विभागानं रेल्टे ट्रॅक दुरुस्तीचं काम सुरु ठेवलंय. एका माहितीनुसार अनेक विभागात रेल्वेचे रुळ बदलण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे जेव्हा-केव्हा लॉकडाऊन संपेल, तेव्हा अनेक भागांमधले रेल्वे रुळ हे पूर्णतः नवीन असणार आहेत. एरव्ही मुंबईसह अनेक शहरांमध्ये छोट्या-मोठ्या दुरुस्तींसाठी आठवड्यातून एक दिवस काही तासांचा मेगाब्लॉक घ्यावा लागतो. त्या वेळेत रेल्वे रुळांची दुरुस्ती केली जाते. मात्र इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेला दुरुस्तीसाठी इतका मोठा वेळ मिळालाय.

9. राजस्थानातल्या एका काँग्रेस आमदारानं अकलेचे तारे तोडले आहेत. दारुनं हात साफ केल्यानंतर जर कोरोना मरत असेल, तर दारु पिल्यानंतर घशातले कोरोना विषाणू सुद्धा मरु शकतात, असं एक पत्र आमदार महोदयांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. पुढे त्याच पत्रात मागणीच्या समर्थनात दारुची दुकानं उघडण्याचंही आवाहन आमदारानं केलंय. भरतसिंह कुंदरपूर असं या आमदाराचं नाव आहे. राजस्थानातील कोटामधले ते आमदार आहेत. जगभरातले शास्त्रज्ञ लसीचा शोध घेत असताना या आमदार महाशयांनी केलेल्या दाव्याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त होतंय.

10. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 2 लाख 34 हजार लोकांचा मृत्यू झालेला असला तरी तब्बल 10 लाख लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. जगातली कोरोनाबाधितांची संख्या ही 32 लाखांच्या घरात आहे. त्यापैकी 10 लाख 48 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 20 लाख 35 हजार लोक सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी

‘जनता कर्फ्यू’ आणि ‘कोरोना’बाबत 10 विलक्षण गोष्टी

दारुऐवजी सॅनिटायझरची निर्मिती, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

Corona Virus : न्यूझीलंडमध्ये सलग दुसऱ्यांदा आणीबाणीच्या कालावधीत वाढ, कोरोनामुळे जगात ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

जगभरात 82 कोटीहून अधिक लोक उपाशी पोटी, कोरोनामुळे घडणाऱ्या ‘या’ 11 घटनांनी जगभरात उलथापालथ

Corona Effect in World

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.