Kolhapur migrant workers | कोल्हापुरात परप्रांतिय मजुरांचा उद्रेक, हजारो मजूर रस्त्यावर

कोल्हापुरात परप्रांतिय कामगारांचा संयम सुटला. (Kolhapur migrant labourers on road) उत्तरप्रदेशला जाण्यासाठी हजारो कामगार रस्त्यावर उतरले.

Kolhapur migrant workers | कोल्हापुरात परप्रांतिय मजुरांचा उद्रेक, हजारो मजूर रस्त्यावर
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 1:42 PM

कोल्हापूर : कोल्हापुरात परप्रांतिय कामगारांचा संयम सुटला. (Kolhapur migrant labourers on road) उत्तरप्रदेशला जाण्यासाठी हजारो कामगार रस्त्यावर उतरले. या मजुरांना कोणीतरी आज ट्रेन सुटणार असल्याचं सांगितलं होतं. या अफवेने हे कामगार शिरोली एमआयडीसी परिसरातून कोल्हापूरच्या दिशेने चालत आले. तावडे हॉटेल परिसरात हजारो कामगार एकत्र आल्याने, पोलीस आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. यावेळी गांधीनगर नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. जिल्हाधिकारी दौलत देसाई,पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी कामगारांना समजावण्याचा प्रयत्न केला. (Kolhapur migrant labourers on road)

कोल्हापूरमध्ये शिरोली, कागल आणि गोकुळ शिरगाव या तीन महत्त्वाच्या एमआयडीसी आहेत. या तिन्ही एमआयडीसीमध्ये हजारो परप्रांतिय कामगार काम करतात. कोल्हापुरातून आतापर्यंत तीन ट्रेन कामगारांना घेऊन परराज्यात गेल्या आहेत. मात्र आज आणखी ट्रेन असल्याची चुकीची माहिती या कामगारांना कोणीतरी दिली आणि एकच हल्लकल्लोळ झाला.

शिरोली एमआयडीसी परिसरात शेकडो मजूर हे पुणे-बंगळुरु महामार्गावर उतरले. कोणत्याही परिस्थितीमध्ये मूळगावी सोडण्याची मागणी हे मजूर करत आहेत. 15 दिवसांपासून खाण्यास काही मिळालं नसल्याचं यांचं म्हणणं आहे. तसंच मालकांनी पगार देऊन वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

काल तिसरी रेल्वे रवाना

कोल्हापुरात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्याच्या गावी सोडण्यासाठी काल बुधवारी कोल्हापुरातून तिसरी रेल्वे सोडण्यात आली. दुपारी एक वाजता ही रेल्वे रवाना झाली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थित उत्तरप्रदेशमधील 1440 कामगारांना आपल्या गावी रवाना करण्यात आले. आतापर्यंत तीन हजार कामगारांना आपल्या गावी सोडण्यात आले आहे. कामगारांना दोन दिवस पुरेल इतके जेवणासह इतर साहित्य देण्यात आले. तर तिकिटांचा सर्व खर्च जिल्हा काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

(Kolhapur migrant labours on road)

संबंधित बातम्या 

Railway Reservation Cancelled | 30 जूनपर्यंत आरक्षित सर्व रेल्वे तिकिटे रद्द, विशेष ट्रेन्स मात्र सुरु राहणार

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.