SHARE MARKET TODAY: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 874 अंकांनी वधारला

रिलायन्स आणि आयटी शेअर्समध्ये (IT SHARES) मोठ्या प्रमाणात खरेदीचे सत्र दिसून आले. कोल इंडिया, बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स तीन टक्क्यांच्या वाढीसह ट्रेडिंग करत आहेत.

SHARE MARKET TODAY: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 874 अंकांनी वधारला
घसरणीचं सत्र थांबेना, सेन्सेक्स 568 अंकांनी गडगडलाImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 7:18 PM

नवी दिल्ली : आठवड्याच्या व्यवहाराच्या चौथ्या दिवशी आज (गुरुवारी) शेअर बाजारात तेजीचं (Today Stock Market ) वातावरण राहिलं. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी नोंदविली गेली. सेन्सेक्स 874 अंकांच्या वाढीसह 57911 वर आणि निफ्टी 256 अंकांच्या वाढीसह 17,392.40 वर ट्रेडिंग सुरू होते. रिलायन्स आणि आयटी शेअर्समध्ये (IT SHARES) मोठ्या प्रमाणात खरेदीचे सत्र दिसून आले. कोल इंडिया, बजाज फिनसर्व्ह, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स तीन टक्क्यांच्या वाढीसह ट्रेडिंग करत आहेत. निफ्टी आयटी इंडेक्समध्ये 1.48 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक तेजी दिसून आली. निफ्टी बँक, ऑटो, एफएमसीजी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि एनर्जीमध्ये खरेदीचं सत्र दिसून आलं. भारतासोबत आशियाई बाजारात (ASIA STOCK MARKET) देखील तेजीचं वातावरण होतं.

अतुल ऑटोचे शेअर वधारले

तीन चाकी वाहन निर्मितीतील अग्रणी अतुल ऑटोच्या शेअर्समध्ये मोठी तेजी नोंदविली गेली. दहा टक्क्यांच्या वाढीसह शेअर्सचे ट्रेडिंग सुरू होते. कंपनीने बॅटरी बदलविणाऱ्या तंत्रज्ञानासह इलेक्ट्रिक वाहन निर्मिती व्यवसायात पाऊल ठेवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडियाच्या समवेत सहकार्यात्मक भागीदारी केली आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज डाउन

आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची घसरण नोंदविली गेली. कंपनीचा आर्थिक पाहणी अहवाल काल (बुधवारी) सादर करण्यात आला होता. कंपनीचा नफ्यात वार्षिक 3.3 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली होती. कंपनीने लाभांश देण्याची देखील घोषणा केली होती.

आजचे वधारणीचे शेअर्स(Todays Top Gainers)

• आयसर मोटर्स (4.34%) • कोल इंडिया (4.12%) • एम अँड एम (3.10%) • कोटक महिंद्रा (2.89%) • मारुती सुझूकी (2.83%)

आजचे घसरणीचे शेअर्स (Todays Top Loosers)

• सिप्ला (-1.19%) • हिंदाल्को (-0.75%) • नेस्ले (-0.71%) • ओएनजीसी (-0.63%) • बजाज ऑटो (-0.56%)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.