178 वर्ष जुनी कंपनी थॉमस कुक बंद, 22 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
ब्रिटनची 178 वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक (Thomas cook close) आपला व्यवसाय बंद करणार आहे, अशी घोषण कंपनीने केली आहे.
लंडन (इंग्लंड) : ब्रिटनची 178 वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक (Thomas cook close) आपला व्यवसाय बंद करत आहे, अशी घोषण कंपनीने केली आहे. आर्थिक संकटात (Financial crisis) सापडल्यामुळे कंपनीने सध्या व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सर्व हॉलिडे, फ्लाईट बुकिंग रद्द केले आहेत. कंपनीने जगभरातली ग्राहकांच्या मदतीसाठी +44 1753 330 330 हा नंबर जारी केला आहे.
थॉमस कुक कंपनी (Thomas cook close) अचानक बंद होणार असल्याने जगभरात फिरायला गेलेले जवळपास 1.50 लाख लोक जिथे-तिथे फसले आहेत. याशिवाय जगभरातली 22 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. यामध्ये 9 हजार कर्मचारी ब्रिटनमधील आहेत.
We are sorry to announce that Thomas Cook has ceased trading with immediate effect.
This account will not be monitored.
Please visit https://t.co/WWiKkzLYQJ for further advice and information.#ThomasCook pic.twitter.com/Nf1X3jn97x
— Thomas Cook (@ThomasCookUK) September 23, 2019
व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी 25 कोटी अमेरिकी डॉलरची गरज आहे. तर गेल्या महिन्यात कंपनी 90 कोटी पाऊंड मिळवण्यात यशस्वी झाली होती. गुंतवणूक करण्यासाठी अयशस्वी झालेल्या कंपनीला सरकारच्या हस्तक्षेपानंतरच ती वाचू शकते. पण अद्याप सरकारकडून हस्तक्षेप झाला नसल्याचे बोललं जात आहे.
थॉमस कुकची 1841 मध्ये स्थापना झाली होती. सुरुवातील कंपनी शहरातील टेंपरेंस चळवळीतील आंदोलकांना ट्रेनद्वारे पोहचवत होती. त्यानंतर कंपनीने परदेशी ट्रिपला सुरुवात केली. 1855 ला कंपनीने पहिली ऐसी ऑपरेटर सुविधा प्रवाशांसाठी सुरु केली. जी ब्रिटिश प्रवाशांना एस्कॉर्ट ट्रिपवर यूरोपीयन देशात घेऊन जात होती. यानंतर 1866 मध्ये कंपनीने अमेरिका ट्रिप आणि 1872 मध्ये संपूर्ण जगात कंपनीने आपली सेवा सुरु केली.
दरम्यान, थॉमस कुक इंडियाकडून शनिवारी स्पष्ट करण्यात आलं की, भारतातील थॉमस कुक कंपनीचा ब्रिटन बेस थॉमस कुक पीएलसी कंपनीसोबत काही संबध नाही. थॉमस कुक इंडिया पूर्णपणे एक वेगळी कंपनी आहे. या कंपनीचे सर्व हक्क कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनॅन्शिअल होल्डिंगकडे आहेत. ब्रिटनची कंपनी थॉमस कुक पीएलसी बंद झाल्यानंतर भारतीय कंपनीवर याचा काही फरक पडणार नाही.