OMG: एक असा देश जिथं बेडकांना रस्ता ओलांडू देण्यासाठी ट्रॅफिक थांबवली जाते

जगभरात असे अनेक देश आहेत जेथे तेथील खास पद्धतीच्या पारंपारिक रुढी पाळल्या जातात. या ऐकल्या तर त्या अगदी गमतीशीरही वाटतात.

OMG: एक असा देश जिथं बेडकांना रस्ता ओलांडू देण्यासाठी ट्रॅफिक थांबवली जाते
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 6:02 PM

बर्लिन : जगभरात असे अनेक देश आहेत जेथे तेथील खास पद्धतीच्या पारंपारिक रुढी पाळल्या जातात. या ऐकल्या तर त्या अगदी गमतीशीरही वाटतात. सध्या सोशल मीडियावर एका अशाच वेगळ्या देशाची हटके परंपरा (युनिक ट्रेडिशन) व्हायरल होत आहे. त्याविषयी ऐकलं तर तुम्हीही अरे देवा (OMG) म्हणत नक्कीच हसाल. जर्मनीत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्यावर एक वेगळाच नजारा पाहायला मिळतो. येथे उन्हाळ्यात लोक चक्क बेडकांना आपली वाहतूक थांबवून रस्ता ओलांडायला मदत करतात (Traffic gets stop for frogs to cross road in bonn city of Germany).

जर्मनीतील बॉन शहरात बेडकं उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपल्या थंडीतील ठिकाणातून निघून रस्त्यावर फिरु लागतात. त्यामुळे वाहतूक सुरु राहिल्यास यातील अनेक बेडकं गाडीखाली येऊन मरतात. कधी कधी तर रस्त्यावर शेकडो बेडकांचे मृतदेह साचलेले दिसतात. त्यामुळे या शहरातील काही स्वयंसेवी संस्था या काळात बेडकांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात. याचाच भाग म्हणून ते बेडून दिसलं की वाहतूक थांबवून या बेडकांना रस्त्यावरुन बाजूला करतात.

या स्वयंसेवी संस्थांचं म्हणणं आहे, “या बेडकांना त्यांच्या ठिकाणांवर सुरक्षित पोहचवण्यासाठी आम्ही त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करतो. या कामात अनेक संस्थांचा सहभाग आहे.” बेडकांना वाचवण्यासाठी येथील स्थानिक सरकारने देखील अनेक उपाययोजना केल्या आहेत.

या शहरात रस्त्याच्या खाली भुयारं बनवण्यात आली आहेत. याचा उपयोग करुन बेडकं कधीही रस्ता पार करुन जातात. याशिवाय सरकारने संपूर्ण बॉन शहरात 800 पेक्षा अधिक फेंसिंग तयार केल्या आहेत. त्यामुळे बेडकांचं गाडीखाली येण्याचं प्रमाण कमी झालं आहे. बेडकांना वाचवण्याचं काम करणाऱ्या संस्थांचे स्वयंसेवक दररोज सकाळी या फेंसिंग तपासतात. यात जर बेडकं असतील तर ती सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडली जातात. लहान रस्त्यांवर बेडकांसाठी वाहतूक देखील थांबवली जाते.

हेही वाचा :

दुसऱ्या महायुद्धातील 5,400 किलोच्या बॉम्बचा पोलंडमध्ये स्फोट, थरकाप उडवणाऱ्या लाटांची निर्मिती

रस्त्याने चालताना समोर अचानक ‘माऊंटेन लायन’, 6 मिनिटांपर्यंत चाललेल्या पाठलागाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

5 लाख देऊन ऑनलाइन मागवलं मांजराचं पिल्लू, बॉक्स उघडताच फुटला घाम

Traffic gets stop for frogs to cross road in bonn city of Germany

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...