नाशिकमध्ये अघोषित भारनियमन; अनेक भागात दिवसभर लाइट गुल

नाशिक शहरात अघोषित भारनियमन सुरू आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण रविवारी दिवसभर अनेक भागात लाइट गुल होती. त्यामुळे नागरिकांना ऑक्टोबर हिटचा त्रास सहन करावा लागला.

नाशिकमध्ये अघोषित भारनियमन; अनेक भागात दिवसभर लाइट गुल
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 6:11 PM

नाशिकः नाशिक शहरात अघोषित भारनियमन सुरू आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण रविवारी (17 ऑक्टोबर) दिवसभर अनेक भागात लाइट गुल होती. त्यामुळे नागरिकांना ऑक्टोबर हिटचा त्रास सहन करावा लागला. सांयकाळी उशिरापर्यंत अनेक भागात लाइट आली नव्हती.

दिवाळीच्या तोंडावर दिल्ली, पंजाब, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद झाले आहे. देशाच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे कोळशाची वाहतूक प्रभावित झाली आहे. आयात केलेल्या कोळशाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्याने आयात केलेल्या कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रे त्यांच्या क्षमतेच्या निम्म्याहून कमी उत्पादन करत आहेत. या दोन कारणांमुळे वीजनिर्मिती क्षेत्र दुहेरी संकटात सापडला आहे. देशात कोळशाचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी, अतिवृष्टीमुळे कोळशाच्या खाणींपासून वीजनिर्मिती युनिटपर्यंत इंधनाच्या वाहतुकीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे. कोळशाच्या संकटामुळे पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, झारखंड, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्येही वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील परळी येथील वीज निर्मिती केंद्रावर देखील प्रभाव पडला आहे. देशभरातील प्रमुख कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्रांमधील संयत्र निम्म्याहून कमी क्षमतेनं उर्जानिर्मिती करत आहेत. यामुळे दिल्लीप्रमाणेच, महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांनाही येत्या काही महिन्यांत विजेची कमतरता भासू शकते. सरासरी, बहुतेक वीज केंद्रांमध्ये फक्त 3 ते 4 दिवसांचा कोळसा आहे. हे सरकारी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कमी साठा आहे. नियमानुसार किमान 2 आठवड्यांचा कोळसा साठा शिल्लक असावा लागतो. भारताच्या वीजनिर्मितीमध्ये कोळशाचा वाटा 70 टक्क्यांहून अधिक आहे. नाशिकचा विचार केला, तर शहराला एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पातून वीजपुरवठा केला जातो. येथील दोन पैकी एक संच सध्या सुरू आहे. त्यामुळे नाशिककरांवर वीज संकट येणार नाही असे बोलले जात होते. मात्र, रविवारी दिवसभर शहरातील अनेक भागात वीज गुल होती. विशेषतः अशोका मार्ग, अशोका हाऊस, बोधलेनगर, नाशिक रोडच्या काही भागात दिवसभर लाइट नव्हती. त्यातही विशेषतः अशोका हाऊस, अशोका मार्ग भागात दुपारी दोनच्या सुमारास गेलेली लाइट सहापर्यंत आली नव्हती. सकाळीही अनेक वेळ लाइट नव्हती. सध्या वर्कफ्रॉम होममुळे अनेक चाकरमान्यांची कामे घरातून सुरू आहेत. त्यात ऑक्टोबर हिटचा उकाडा. त्यामुळे रविवारचा दिवस चाकरमान्यांना तगमगीत घालवावा लागला. याबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला. मात्र, त्यांचा संपर्क झाला नसल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

…तर उद्योगांना जबर फटका खरोखरच नाशिकमध्ये भारनियमन झाल्यास जिल्ह्यातल्या उद्योगांना जबर फटका बसू शकतो. त्यातही स्टील उद्योग आणि शीतगृहांना मोठा फटका बसणार आहे. कारण या दोन्ही उद्योगांचा कच्चा माल वीज आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात जवळपास दहा स्टील प्रकल्प आहेत. शीतगृहांचे प्रमाणही मोठे आहे. नाशिकला एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पातून वीजपुरवठा केला जातो. या प्रकल्पातील दौन पैकी एक संच सध्या तरी सुरू आहे. त्यामुळे नाशिककरांना तूर्तास तरी भारनियमनाच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर बातम्याः

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत 2869 उमेदवारांच्या तक्रारी; नाशिकमध्ये संचालकांनी केले शंका निरसन

Gold Special: खणखणीत परतावा देणारं हुकमी नाणं म्हणजे बावनकशी सोनं, कसं ते जाणून घेऊयात!

आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.