अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी पुन्हा जेलबाहेर येणार?
नागपूर : गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी पुन्हा एकदा जेलबाहेर येण्याची शक्यता आहे. डॉन अरुण गवळीने संचित रजेसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर नागपूर खंडपीठात पुढील सोमवारी म्हणजेच 25 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे नागपूर खंडपीठ डॉ. अरुण गवळीची संचित रजा मंजूर करतं का, हे पाहणे […]

नागपूर : गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी पुन्हा एकदा जेलबाहेर येण्याची शक्यता आहे. डॉन अरुण गवळीने संचित रजेसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर नागपूर खंडपीठात पुढील सोमवारी म्हणजेच 25 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे नागपूर खंडपीठ डॉ. अरुण गवळीची संचित रजा मंजूर करतं का, हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.
डॉन अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
विशेष म्हणजे, डॉन अरुण गवळी याआधीही दोन ते तीन वेळा जेलबाहेर आला आहे. मुलाचे लग्न, आजारपण अशी कारणे देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता. आता पुन्हा नागपूर मध्यवर्ती कारागृह अरुण गवळीला रजा मंजूर करुन बाहेर सोडणार का, हे सोमवारीच समोर येईल.
सध्या राज्यात निवडणुकांचं वातावरण आहे. त्यामुळे अरुण गवळीसारख्या कुख्यात गुंडाला रजेनिमित्त जेलबाहेर पाठवणं कितपत योग्य ठरेल, हाही प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. त्यामुळे नागपूर खंडपीठ आणि नागपूर मध्यवर्ती कारागृह काय निर्णय घेतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.