आम्हाला कोणताही ईगो नाही, चर्चेसाठी नवी तारीख सांगा; केंद्र सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन

कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून गेल्या 15 दिवसांपासून शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये जोरबैठका सुरू असून त्यातून काहीही तोडगा निघालेला नाही. (Narendra Singh Tomar appeals farmers to set new date for meeting)

आम्हाला कोणताही ईगो नाही, चर्चेसाठी नवी तारीख सांगा; केंद्र सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 5:46 PM

नवी दिल्ली: कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून गेल्या 15 दिवसांपासून शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये जोरबैठका सुरू असून त्यातून काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेची नवी तारीख देण्यास सांगितलं आहे. आम्हाला ईगो नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. (Narendra Singh Tomar appeals farmers to set new date for meeting)

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडातून मुक्त करण्याची आमची इच्छा आहे. शेतकऱ्यांच्या मालाच्या खरेदी-विक्रीवर टॅक्स लागू नये त्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असं तोमर यांनी सांगितलं. तसेच शेतकरी संघटनांनी चर्चेची तारीख सांगावी, आम्ही त्यांचे संपूर्ण समाधान होईपर्यंत चर्चा करण्यास तयार आहोत, असंही ते म्हणाले.

तरतुदींवर चर्चा व्हावी

कायद्याचं बंधन आल्याने लोकांना त्याचा फायदाच होईल, असं आम्हाला वाटत होतं. शेतकरी पिकं घेताना नवे प्रयोग करतील. नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतील. पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना त्याच्या मूल्याची हमी मिळेल, असं आम्हाला वाटत होतं असंही ते म्हणाले. केंद्राचे तिन्ही कायदे रद्द करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी होती. पण कायद्यातील ज्या तरतुदींवर शेतकऱ्यांच आक्षेप आहेत त्यावर मनमोकळी चर्चा व्हावी यासाठी आम्ही तयार आहोत. सरकारला कोणताही अंहकार नाही. शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या प्रश्नांचं निरसन करण्यास आम्हाला काहीही अडचण नाही, असंही त्यांनी सांगितलं.

कायद्याच्या वैधतेवरही चर्चा

चर्चेच्या वेळी या कायद्याच्या वैधतेचाही विषय निघाला होता. हा केंद्राचा विषय नसून राज्यांचा विषय असल्याचं काही लोकांना सांगितलं गेलं होतं. हा विषय राज्यांचा असल्याने केंद्र सरकार त्यावर कायदा करू शकत नाही, असंही त्यांना सांगितलं गेलं होतं, असं तोमर यांनी सांगितलं. मात्र, या कायद्यातून शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सुरक्षेची पूर्ण हमी देण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं. (Narendra Singh Tomar appeals farmers to set new date for meeting)

संबंधित बातम्या:

शेतकरी आंदोलनाचा 15वा दिवस, प्रस्ताव फेटाळ्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार

आम्ही कृषीमाल खरेदी करतच नाही; शेतकऱ्यांच्या बहिष्कारानंतर अदानी समूहाचे स्पष्टीकरण

केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, काय म्हटलंय नव्या प्रस्तावात…?

(Narendra Singh Tomar appeals farmers to set new date for meeting)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.