विकृती! देशातल्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड फेकले

नवी दिल्ली : लोकांनी शिवशाही बसमधले ब्लँकेट पळवले, तेजस एक्स्प्रेसमधील हेडफोन चोरले आणि आता देशातली सर्वात वेगवान ट्रेन 18 वर दगडफेक करण्यात आली. दिल्ली ते आग्रा मार्गावर या ट्रेनची चाचणी घेण्यात येत असताना समाजकंटकांनी हा प्रकार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला 29 डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दिल्ली ते आग्रा मार्गावर ट्रेन 18 […]

विकृती! देशातल्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड फेकले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

नवी दिल्ली : लोकांनी शिवशाही बसमधले ब्लँकेट पळवले, तेजस एक्स्प्रेसमधील हेडफोन चोरले आणि आता देशातली सर्वात वेगवान ट्रेन 18 वर दगडफेक करण्यात आली. दिल्ली ते आग्रा मार्गावर या ट्रेनची चाचणी घेण्यात येत असताना समाजकंटकांनी हा प्रकार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला 29 डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

दिल्ली ते आग्रा मार्गावर ट्रेन 18 180 किमी प्रति घंटा वेगाने धावत होती. आधुनिक रेल्वे बनवणाऱ्या इंटिग्रल कोच फॅक्टरीचे मुख्य डिझाईनर मोटरमनच्या डब्यात होते. 181 किमी प्रति घंटा वेग नोंदवण्यात आला. पण काही समाजकंटकांनी ट्रेनवर दगड फेकला, ज्यात डब्याची काच फुटली आहे. लवकरच या समाजकंटकांना पकडलं जाईल, असं ट्वीट आयसीएफचे संचालक सुधांशू मनू यांनी केलं.

आयसीएफकडून शंभर कोटी रुपये खर्च करुन देशातली सर्वात वेगवान ट्रेन बनवण्यात आली आहे. या ट्रेनला तयार करण्यासाठी 18 महिने लागले, ज्यामुळे नावही ट्रेन 18 असं देण्यात आलं. या ट्रेनने चाचणीदरम्यान 180 किमीचा वेग गाठून देशातली सर्वात वेगवान ट्रेन होण्याचा मान मिळवला आहे.

काय आहे ट्रेन 18 चं वैशिष्ट्य?

ही एक अत्याधुनिक ट्रेन आहे, ज्यात वायफायपासून सर्व सुविधा देण्यात येणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे, या ट्रेनला इंजिन नसेल. लोकल ट्रेनप्रमाणे दोन्ही बाजूने ड्रायव्हिंग कॅप्स असतील, ज्यामुळे दोन्ही बाजूने ही ट्रेन चालेल. राजधानी आणि शताब्दी या ट्रेनच्या पंक्तीत हे ट्रेन बसणार आहे.

बुलेट ट्रेनसारखा लूक असणारी ही ट्रेन राजधानी आणि शताब्दी या ट्रेनच्या वेगाने चालणार आहे, ज्यामुळे वेळेत 10 ते 15 टक्क्यांची बचत होईल.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.