AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुमकेतूवरील सोने लुटीसाठी अमेरिका-चीनमध्ये धुमश्चक्री, सोन्याची किंमत चक्रावून सोडणारी

अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं 2019 मध्ये सोन्याचा धुमकेतू शोधल्याचा दावा केला. नासाच्या दाव्यानुसार इथं मोठ्या प्रमाणात सोनं आहे (US-China dispute over gold comet).

धुमकेतूवरील सोने लुटीसाठी अमेरिका-चीनमध्ये धुमश्चक्री, सोन्याची किंमत चक्रावून सोडणारी
Follow us
| Updated on: Jul 14, 2020 | 5:12 PM

मुंबई : अनेकांना माहिती नसेल, पण अंतराळात असलेल्या सोन्याचा धुमकेतूवर अनेकांचा डोळा आहे (US-China dispute over gold comet). अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं 2019 मध्ये हा धुमकेतू शोधल्याचा दावा केला. नासाच्या दाव्यानुसार इथं मोठ्या प्रमाणात सोनं आहे. या सोन्याचा अंदाज काढला, तर समजा हे सोनं जमिनीवर आणलं गेलं, तर पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस अब्जाधीश होईल (US-China dispute over gold comet).

मात्र, सौरमंडळातल्या याच सोन्याचा धुमकेतूवरुन तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याची चिन्हं आहेत. कारण, अमेरिकेत ट्रम्प सत्तेत आल्यानंतर नासा डोळ्यात तेल घालून या धुमकेतूवर नजर ठेवून आहे. दुसरीकडे चीनसुद्धा सोन्याच्या या खजिन्यासाठी टपून बसला आहे.

नासाच्या दाव्यानंतर चीनची अंतराळ संस्था हात धुवून या धुमकेतूच्या पाठिमागे लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चीन सरकारनं त्यासाठी अंतराळातल्या अब्जावधी रुपयांच्या योजनासुद्धा तयार केल्या आहेत. मात्र नासाला या सोन्याच्या धुमकेतूचा शोध कसा आणि कधी लागला, त्यासाठी त्याची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

5 जुलै 2019 रोजी अंतराळात सोन्याच्या धुमकेतू असल्याची बातमी जेव्हा जगासमोर आली, तेव्हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि बिजिंगपासून वॉशिंग्टन डीसीपर्यंत एकच खळबळ माजली. चीनची अंतराळ संस्थासुद्धा अनेक वर्षांपासून या धुमकेतूच्या शोधात होती. मात्र अमेरिकेच्या शास्रज्ञांनी चीनला मात देऊन सर्वात आधी हा धुमकेतू शोधून काढला.

”16 साइचे” असं या धुमकेतूला नाव दिलं गेलं. वास्तविक धुमकेतू म्हणजे दगडाचे छोट्या-मोठ्या प्रमाणात विखुरलेले तुकडे असतात, जे ग्रहाप्रमाणे एकसंध नसल्यामुळे सौरमंडळात फिरतात. मात्र हा पहिला धुमकेतू आहे, की जो सोन्याचा असल्याचा दावा नासानं केला.

सार्वजनिकपणे जी माहिती उपलब्ध आहे, त्यानुसार हा धुमकेतू मंगळ आणि बुध ग्रहादरम्यान सूर्याभोवती फिरतो. या ग्रहाचं पृथ्वीपासूनचं अंतर 50 कोटी किलोमीटर सांगितलं जातं. या धुमकेतूचा विस्तार तब्बल 200 वर्ग किलोमीटरपर्यंत पसरल्याचा दावा आहे, म्हणजे आकारानं हा धुमकेतू पुणे ते सोलापूर इतक्या लांबीचा आहे.

आता हे ठिकाण तिसऱ्या महायुद्धाचं कारण का ठरु शकतं?

एका अंदाजाप्रमाणे या धुमकेतूवरचं सोनं हे 700 क्वॉड्रिलियन डॉलरचं आहे. आता क्वॉड्रिलियन म्हणजे काय, तर एक क्वॉड्रिलियनच्या मागे 18 शून्य लागतात. भारतीय रुपयात मोजायचं झालं, तर या धुमकेतूवर 49 हजार कोटी खरब इतकं सोनं आहे. जर समजा हे सोनं पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीला वाटायचं जरी ठरलं, तरी प्रत्येकाच्या वाट्याला काही ट्रिलीयनचं सोनं येईल. याचा अर्थ पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस हा अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्यापेक्षाही जास्त श्रीमंत असेल.

आता कोण सर्वात आधी या धुमकेतूवर लँड होतो, यावरुन चीन-अमेरिकेत स्पर्धा आहे. चीनमध्ये अजून त्याची तयारी सुरु असली तरी अमेरिकेनं ‘मिशन स्वर्णलोक’ची आखणीसुद्धा केली आहे.

2022 पर्यंत अमेरिका सोन्याच्या धुमकेतूवर एक मानवविरहीत यान पाठवणार आहे. 2026 पर्यंत हे यान धुमकेतूच्या जवळ पोहोचेल. त्यानंतर सोन्याच्या उत्खननाची शक्यता तपासली जाणार आहे. त्यासाठी खाण खोदकाम करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्यांनाशीसुद्धा नासानं संपर्क केला आहे.

या धुमकेतूवर खरोखर किती सोनं आहे, सौरमंडळात अजून असे किती धुमकेतू आहेत, याचा तपास नासाचं विमान तिकडे लँड झाल्यानंतर लागेल. मात्र त्याआधी आकाशातल्या या सोन्यासाठी चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये हा धुमकेतू धुमश्चक्री घडवू शकतो.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....