जो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर, जॉर्जियात फेरमतमोजणी; ट्रम्प यांच्या न्यायालयीन लढाईसाठी पैसे जमवायला सुरुवात

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या वाढत्या आघाडीबरोबर ट्रम्प समर्थकांचा न्यायालयात जाण्याचा विचार आणखीनच पक्का झालाआहे.

जो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर, जॉर्जियात फेरमतमोजणी; ट्रम्प यांच्या न्यायालयीन लढाईसाठी पैसे जमवायला सुरुवात
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 7:44 AM

न्यूयॉर्क: अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या मतमोजणीवरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता हा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता आणखीनच वाढली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या वाढत्या आघाडीबरोबर ट्रम्प समर्थकांचा न्यायालयात जाण्याचा विचार आणखीनच पक्का झालाआहे. अशातच आता जॉर्जियामध्ये मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यामध्ये अवघ्या काही मतांचे अंतर आहे. त्यामुळे कोणतीही शंका न ठेवण्यासाठी आम्ही जॉर्जियातील मतांची फेरमोजणी करण्याचा निर्णय घेतल्याचे जॉर्जियाचे सचिव ब्रॅड राफेनस्पर्गरर यांनी सांगितले. (US Election Results 2020 LIVE Updates After slow count now recount)

आता केवळ 4169 मतांची मोजणी होणे बाकी आहे. तर लष्करात काम करणाऱ्या जॉर्जियातील मतदारांनी टपालाद्वारे पाठवलेली मते अजूनही आलेली नाहीत. ही पोस्टल बॅलेटस शनिवारी संध्याकाळपर्यंत आली तरच ग्राह्य धरली जातील, असेही ब्रॅड राफेनस्पर्गरर यांनी सांगितले.

तर दुसरीकडे जो बायडेन यांची आघाडी भक्कम होत असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाने न्यायालयात जाण्याची तयारी पूर्ण केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या न्यायालयीन लढाईसाठी रिपब्लिकन पक्ष 60 दक्षलक्ष डॉलर्सचा निधी उभारणार असल्याची चर्चा आहे.

सध्याची परिस्थिती पाहता जो बिडेन हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. जो बिडेन यांनी आतापर्यंत 264 तर डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत 270 इलेक्टोरल व्होटस जिंकली आहेत. तसेच जो बायडेन यांनी जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया आणि नेवाडा या तीन राज्यांमध्ये निर्णायक आघाडी घेतली आहे. तर डोनाल्ड ट्रम्प सध्या नॉर्थ कॅरोलायनामध्ये आघाडीवर आहेत. याठिकाणी विजय मिळाल्यास ट्रम्प यांच्या पारड्यात 15 इलेक्टोरल व्होटसची भर पडेल. परंतु, विजयासाठी ट्रम्प यांना इतर तीन राज्येही खिशात घालणे आवश्यक आहे. परंतु, तुर्तास या तिन्ही राज्यांमध्ये बायडेन आघाडीवर असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

संबंधित बातम्या:

US Election 2020: डोनाल्‍ड ट्रम्प यांचा पराभव निश्चित, मात्र बायडन यांच्या डोकेदुखीतही वाढ होणार?

US Election : डोनाल्ड ट्रम्पना झटका, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका

US Election 2020 : जय-पराजयाचा फैसला मी किंवा बायडन नव्हे, तर न्यायमूर्ती करणार : डोनाल्ड ट्रम्प

(US Election Results 2020 LIVE Updates After slow count now recount)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.