Kung Flu | ‘कोरोना’ म्हणजे ‘कुंग फ्लू’, निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच रॅलीत ट्रम्प यांचे चीनवर शरसंधान
चीनी मार्शल आर्ट प्रकार 'कुंग फु'वरुन श्लेष साधत डोनाल्ड ट्रम्प यांनी 'कोरोना'ला 'कुंग फ्लू' असे संबोधले. (Donald Trump coronavirus kung flu)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला बालेकिल्ला ओकलाहोमातून अध्यक्षीय निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ वाढवला. पहिल्याच प्रचार रॅलीमध्ये ट्रम्प यांनी चीनला निवडणुकांचा मुद्दा म्हणून उचलून धरले. ‘कोरोना’ला 19 नावे दिली जाऊ शकतात, आपण त्याला ‘कुंग फ्लू’ म्हणू शकतो, अशा शब्दात ट्रम्प यांनी चीनवर शरसंधान साधले. (Donald Trump refers to coronavirus as kung flu during Tulsa rally)
ट्रम्प यांनी याआधीही ‘वूहान व्हायरस’, ‘चायनीज व्हायरस’ अशा शब्दात वंशभेदी टिपण्णी केली होती. आता चीनी मार्शल आर्ट प्रकार ‘कुंग फु’वरुन श्लेष साधत ‘कोरोना’ला ‘कुंग फ्लू’ असे संबोधले.
ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी ‘डेमोक्रेटिक पक्षा’चे उमेदवार जो बिडेन यांच्यावरही निशाणा साधला. “बिडेन हे कट्टरपंथी डाव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या हातातील असहाय्य बाहुली आहेत. आम्हाला रोखण्यासाठी ते प्रत्येक दिवशी हिंसाचार आणि लूटपाट करत आहेत. दंगेखोरांना रसद पुरवत आहेत. स्मारके, प्रतिमा यांची नासधूस करुन आपला इतिहास नष्ट करु पाहत आहेत. त्यांच्या मागण्यांशी असहमत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते शिक्षा ठोठावू पाहत आहेत” असा आरोप ट्रम्प यांनी केला.
हेही वाचा : मी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत : डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी ओकलाहोमातील टुलसा शहरात असलेल्या स्टेडियममध्ये जवळपास 100 मिनिटे भाषण केले. स्टेडियममध्ये बहुतांश व्यक्तींनी मास्क घातला नसल्याची माहिती आहे. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगलाही हरताळ फासला. पोलिसांनी केवळ स्टेडियममध्ये प्रवेशापूर्वी त्यांचे तापमान तपासल्याचे बोलले जाते. (Donald Trump refers to coronavirus as kung flu during Tulsa rally)
रॅलीआधी ट्रम्प यांच्या प्रचारातील 6 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह सापडले. रॅलीमध्ये एक जण बेशुद्ध पडल्याने ट्रम्प यांनी भाषण थांबवून डॉक्टरांना बोलावले.
My initial gut reaction seeing this picture was one of pity for Trump, an old man with a stressful job during a tumultuous time for our nation. Then I remembered how he called COVID-19 the Chinese Virus and the Kung Flu to rile up the mob against Asian Americans. No more empathy. pic.twitter.com/PEzpiSHOQN
— Eugene Gu, MD (@eugenegu) June 21, 2020
(Donald Trump refers to coronavirus as kung flu during Tulsa rally)