US Presidential Election: काश्मीर पाकिस्तानचा हिस्सा, ट्रम्प यांच्या मुलाने शेअर केला वादग्रस्त नकाशा
संपूर्ण जगाचं लक्ष सध्या अमेरिकेच्या 46 व्या अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाकडे लागलं आहे.
मुंबई : संपूर्ण जगाचं लक्ष सध्या अमेरिकेच्या 46 व्या अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाकडे (America Election result) लागलं आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार?, की डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) इतिहास घडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काल (03 नोव्हेंबर) मतदान पार पडल्यानंतर अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये मतमोजणी पार पडत आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने म्हणजेच ट्रम्प ज्युनिअर (Donald Trump Jr.) यांनी निवडणुकांच्या निकालाचा अंदाज एका नकाशाद्वारे शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी भारताच्या नकाशाबाबत मात्र मोठी चूक केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या नकाशामध्ये जम्मू आणि काश्मीर हा भारताचा नव्हे तर पाकिस्तानचा भाग असल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर त्यांनी भारताला बायडन प्रभावित देश घोषित केलं आहे. (Donal Trump’s son Trump Jr. shared disputed map of India told Kashmir is part of Pakistan)
ट्रम्प ज्युनियर यांनी शेअर केलेला जगाचा नकाशा दोन रंगांमध्ये आहे. त्यामध्ये बहुसंख्य देश हे लाल रंगात तर काही देश हे निळ्या रंगात दाखवले आहेत. लाल रंगात दिसणारे देश हे ट्रम्प प्रभावित देश आाहेत, तर निळ्या रंगात दिसत असलेले देश हे बायडन प्रभावित देश असल्याचा दावा ट्रम्प ज्युनियर यांनी केला आहे. यामध्ये भारत निळ्या रंगात दिसत आहे. तसेच या नकाशात काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. भारतासह चीन, मेक्सिको, लायबेरिया हे देश बायडन यांना समर्थन देणारे देश असल्याचे नकाशात दाखवण्यात आले आहे. तर पाकिस्तान, रशिया आणि ईराणसारखे देश ट्रम्प समर्थक असल्याचे दिसत आहे.
Okay, finally got around to making my electoral map prediction. #2020Election #VOTE pic.twitter.com/STmDSuQTMb
— Donald Trump Jr. (@DonaldJTrumpJr) November 3, 2020
या नकाशात अजून एक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे चीन हा देश ट्रम्प समर्थक असल्याचा दावा करण्यात आला आहे. वास्तविक चीन आणि अमेरिकेचे संबंध गेल्या काही वर्षात बिघडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सातत्याने चीनला विरोध करत आहेत. तसेच निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना विषाणूच्या प्रसारावरून चीनवर निशाणा साधला होता. तसेच करोनाच्या प्रसारासाठी चीनच जबाबदार असल्याचा आरोप ते सातत्याने करत आहेत. तसेच रशिया आणि अमेरिकेचेही संबंध फार बरे नाहीत. तरीदेखील ज्युनियर ट्रम्प यांनी रशिय ट्रम्प समर्थक असल्याचे म्हटले आहे.
संबंधित बातम्या
US Election 2020 LIVE : डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात सुरुवातीच्या कलात काट्याची टक्कर
US Election 2020 : ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य ‘या’ 12 राज्यांच्या हातात
US Election 2020 live: इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेला डिवचलं
(US Presidential Election 2020 : Donal Trump’s son Trump Jr. shared disputed map of India told Kashmir is part of Pakistan)