अमेरिकेच्या निवडणूक निकालाला न्यायालयात आव्हान, ट्रम्प यांच्या 5 खटल्यांचा निर्णय जाहीर
ट्रम्प यांनी निवडणूक निकाल अमान्य करत 6 खटले केले. अखेर न्यायालयाने या खटल्यांवर आपला निर्णय दिला आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्षीय निवडणुकीत (US Presidential Election 2020) रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. ही चुरस इतकी वाढली की ट्रम्प यांनी निवडणूक निकालाला थेट न्यायालयात आव्हान दिलं. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी निकाल अमान्य करत 6 खटले केले होते. त्यामुळे यावर न्यायालय काय भूमिका घेणार आणि अमेरिकेचा पुढील अध्यक्ष कोण होणार याकडे जगभरातील लोकांचं लक्ष होतं. अखेर न्यायालयाने यातील 5 खटल्यांवर निर्णय दिला आहे (US presidential election 2020 Donald Trump challenges election result court decision).
1. एरिजोना (Arizona):
एरिजोना रिपब्लिकन पक्षाने अमेरिकेची सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या काउंटी मेरीकोपाच्या निवडणुकीच्या निकालाचं प्रमाणपत्र जारी करणं थांबवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणच्या मतांची पुन्हा मोजणी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या मतांची तपासणी केली असून कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याचं स्पष्ट केलं.
निकाल :
निवडणूक निकाल प्रमाणपत्र रोखण्यासाठी केलेली ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती जॉन हाना यांनी संबंधित याचिका निरुपयोगी असल्याचं सांगत रिपब्लिकनला या प्रकरणी पुन्हा याचिका करण्यासही परवानगी नाकारली.
2. जॉर्जिया (Georgia):
अमेरिकेचे प्रतिष्ठित वकील एल. लिनवूड जूनियर यांनी जॉर्जियामधील मतमोजणी थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. वुड यांनी जॉर्जियात गैरहजर नागरिकांच्या मतदानाच्या प्रक्रियेत बेकायदेशीरपणे बदल केल्याचा आरोप केला होता. जॉर्जियाचे उपसचिव यांनी हा आरोप आधारहीन आणि बालिश असल्याचं म्हटलं होतं.
निकाल :
या प्रकरणावरील सुनावणीत न्यायालयाने वूड यांची याचिका फेटाळली. जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन कँप यांनी शुक्रवारी (20 नोव्हेंबर) निवडणूक निकालाचे प्रमाणपत्र जाहीर केले. यात जो बायडन यांचा विजय झालाय. या निकालासह राष्ट्राध्यक्षपदासाठी बायडन यांचा मार्ग मोकळा झालाय.
3. मिशिगन (Michigan):
ट्रम्प यांच्या टीमने मिशिगनमध्ये देखील निवडणूक निकाल रोखण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवरच घोटाळा केल्याचा आरोप केला. पर्यवेक्षकांनी मतमोजणीवर व्यवस्थित लक्ष ठेऊ दिलं नाही आणि अयोग्य मतांची मोजणी करत रिपब्लिकनच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप ट्रम्प यांच्या टीमने केला.
निकाल :
या ठिकाणची याचिका स्वतः ट्रम्प यांच्या टीमनेच गुरुवारी (19 नोव्हेंबर) मागे घेतली.
4. पेनेस्लवेनिया (Pennsylvania) :
या ठिकाणी देखील ट्रम्प यांनी निवडणूक घोषित करु नये अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. यात फिलेडेल्फिया आणि छह काउंटीमध्ये मतदारांना मतदान करताना येणाऱ्या त्रुटी चुकीच्या पद्धतीने दूर करण्यास परवानगी दिल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. तसेच असं केलं नसतं तर तांत्रिकदृष्ट्या ही मतं आपोआप अयोग्य झाली असती, असाही दावा करण्यात आला.
निकाल :
डोनाल्ड ट्रंप के निजी वकील रूडी गियुलियानी ने इस केस पर आखिरकार अपने हस्ताक्षर किए जबकि अन्य ने खुद को इससे दूर कर लिया. न्यूयॉर्क सिटी के इस पूर्व मेयर ने 1990 के बाद पहली बार कोर्ट में जिरह की. गियुलियानी ने राष्ट्रव्यापी साजिश जैसे बेबुनियाद आरोप लगाए. इस केस की सुनवाई गुरुवार को होनी थी, लेकिन अब अगले हफ्ते यह केस नए सिरे से फाइल होगा. 23 नवंबर को यहां परिणाम घोषित कर दिए जाएंगे.
5. विस्कॉन्सिन (Wisconsin) :
ट्रम्प यांच्या प्रचार टीमने मिलवाउकी आणि मेडिसनमध्ये पुन्हा मतमोजणी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. ही दोन्ही ठिकाणं डेमॉक्रेटीक पक्षाचे किल्ले मानले जातात. ट्रम्प यांनी या ठिकाणी गैरहजर मतदारांच्या मतपत्रिकेसोबत गैरप्रकार झाल्याचा आणि सरकारी अधिकाऱ्यांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.
निकाल :
जो बायडन यांनी विस्कॉन्सिनमध्ये 20,600 मतांनी विजय मिळवला आहे. 8 डिसेंबरला या ठिकाणचा अधिकृत निर्णय जाहीर होणार आहे. असं असलं तरी ट्रम्प यांच्याकडून हजारो मतदार गैरहजर असल्याचा दावा करत ही मतं रद्द करण्याची मागणी करत आहेत.
6. नेवेदा (Neveda):
ट्रम्प यांच्याकडून नेवेदाचे निवडणूक निकाल रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यांनी निवडणुकीत गैरप्रकारे मतदान झाल्याचा आणि मतपत्रिकांवर स्कॅन करुन स्वाक्षरी केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा निकाल अद्याप घोषित नसला तरी लवकरच हा निकाल लागण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
नरेंद्र मोदी-जो बायडन यांच्यात फोन पे चर्चा, भारत अमेरिका एकत्रितपणे जागतिक आव्हानांशी लढणार
अमेरिकेच्या नियोजित अध्यक्षांकडून भारतीयांना दीपावलीच्या शुभेच्छा, जो बायडन म्हणाले…
US presidential election 2020 Donald Trump challenges election result court decision