चार वर्षांच्या अफेअरनंतर विवाह, तीन दिवसात पतीची ट्रेनखाली उडी, पत्नीचाही गळफास

चार वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने विशाल-निशा 29 जून रोजी विवाहबंधनात अडकले, मात्र लग्नाच्या तीन दिवसांनी विशालने आत्महत्या केली

चार वर्षांच्या अफेअरनंतर विवाह, तीन दिवसात पतीची ट्रेनखाली उडी, पत्नीचाही गळफास
Follow us
| Updated on: Jul 05, 2020 | 7:34 PM

लखनौ : लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच नवविवाहित दाम्पत्याने एकामागून एक आत्महत्या केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आला आहे. नवऱ्याने आधी ट्रेनखाली उडी मारुन जीव दिला, तर जबर मानसिक धक्का बसलेल्या पत्नीनेही दुसऱ्याच दिवशी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. (Uttar Pradesh Ghaziabad Newly Married Couple commits Suicide)

गाझियाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या विशाल प्रजापती आणि निशा गौतम यांचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने दोघे 29 जून रोजी विवाहबंधनात अडकले, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

पती विशाल गाझियाबादमधील गोविंदापुरम भागात कोचिंग सेंटरमध्ये कॉमर्स क्लास घ्यायचा. तर निशा एका मल्टीनॅशनल कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून काम करायची.

विशाल गुरुवारी घरातील कोणालाच न सांगता एकाएकी बेपत्ता झाला. तो हरवल्याची तक्रार कुटुंबीयांनी संध्याकाळी पोलिसात दिली. वारंवार फोन करुनही तो उचलत नसल्याने प्रजापती कुटुंब घाबरेघुबरे झाले होते. रात्री एका तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळांजवळ सापडला, त्याची ओळख पटवली असता तो विशालचा असल्याचे समोर आले. मेहरौली रेल्वे क्रॉसिंगवर धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन त्याने आयुष्य संपवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : बायकोची आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी नवऱ्याचीही चितेत उडी, वाचवलेल्या नवऱ्याने पुन्हा विहिरीत जीव दिला

दुसर्‍या दिवशी निशाला तिच्या आई-वडिलांनी सासरहून कवी नगरमधील कैलाश पुरी कॉलनीत असलेल्या माहेरी नेले. आई-वडिलांनी तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, परंतु रात्रीच तिने स्वतःच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. विशाल-निशाचा असा करुण अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही पहा :

(Uttar Pradesh Ghaziabad Newly Married Couple commits Suicide)

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.