Uttarakhand : गैरहिंदूंना चार धाम यात्रा करता येणार नाही? सीएम पुष्कर धामी यांचा फतवा!
Uttarakhand : उत्तराखंडमधील चार धाम यात्रेवरून (Uttarakhand Char Dham Yatra) सध्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत. तर वेगवेगळ्या मागण्याही समोर येत आहेत. आता अशाच एक मागणी समोर आली असून ही मागणी अनेक संतांनी उत्तराखंड सरकारकडे चार धामवरून केली आहे. हरिद्वारच्या धर्म संसदेतून (Haridwar Dharma Sansad) अनेक संतांनी सरकारकडे चार धाम भागात बिगर हिंदूंच्या (Non-Hindu) प्रवेशावर […]
Uttarakhand : उत्तराखंडमधील चार धाम यात्रेवरून (Uttarakhand Char Dham Yatra) सध्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत. तर वेगवेगळ्या मागण्याही समोर येत आहेत. आता अशाच एक मागणी समोर आली असून ही मागणी अनेक संतांनी उत्तराखंड सरकारकडे चार धामवरून केली आहे. हरिद्वारच्या धर्म संसदेतून (Haridwar Dharma Sansad) अनेक संतांनी सरकारकडे चार धाम भागात बिगर हिंदूंच्या (Non-Hindu) प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी थेट फतवा काढत गैरहिंदूंना चार धाम यात्रा करता येणार नाही असे म्हटले आहे. तसेच त्यांनी राज्यातील अशा कोणत्याही भागात जेथे लोक पडताळणीशिवाय आढळून येतील त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचेही म्हटले आहे. तसेच त्यांनी, उत्तराखंडच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक प्रतिमेला कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी एक मोहीमही चालवली जात आहे आणि त्याचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी सरकार त्यावर काम करत असल्याचेही म्हटले आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, आपले राज्य शांत राहिले पाहिजे. आपल्या राज्याची धार्मिक संस्कृती अबाधित राहिली पाहिजे. त्याबाबतही शासन आपल्या स्तरावर मोहीम राबवणार आहे. मुख्यमंत्री धामी म्हणाले की, ज्यांची पडताळणी नाही त्यांचीही योग्य पडताळणी झाली पाहिजे, अशा प्रकारचे लोक येथे येऊ नयेत, ज्यामुळे येथील परिस्थिती बिघडू शकते.
संतांनी लिहिले पत्र
किंबहुना, हरिद्वारमधील उत्तराखंडमधील चार धामांमध्ये बिगर हिंदूंच्या प्रवेशाचा मुद्दा जोरात तापू लागला आहे. या प्रकरणी संतांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्रही लिहिले आहे. उत्तराखंडमधील चार धामांमध्ये बिगर हिंदूंना प्रवेशबंदी करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. या पत्रात दुरुस्ती कायदा आणून मोकळीक केल्याची चर्चा आहे. खरे तर साध्वी प्राचीनंतर शंकराचार्य परिषदेनेही चार धाममध्ये बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालावी, अशी मागणी लावून धरली आहे.
3 मेपासून चार धाम यात्रा सुरू
उत्तराखंडमधील चार धाममध्ये देश-विदेशातील हजारो प्रवासी येतात. यासोबतच इतर धर्माचे लोकही चार धामच्या यात्रेला येतात. उत्तराखंडमधील चार धाम राज्याच्या महसुलासह सामान्य लोकांची अर्थव्यवस्था मजबूत करते. हे सर्व चार धामांना भेट देणाऱ्या यात्रेकरूंमुळेच शक्य होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ३ मे पासून उत्तराखंडची चार धाम यात्रा सुरु होत आहे, ज्यामध्ये गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे ३ मे रोजी उघडणार आहेत. यासोबतच 6 मे रोजी बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडणार आहेत. आणि 8 मे रोजी भगवान बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातील.
इतर बातम्या :