ना प्रेम करणार, ना प्रेम विवाह, ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला शाळेत विद्यार्थिनींना शपथ

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रेम विवाह न करण्याची शपथ घेतली

ना प्रेम करणार, ना प्रेम विवाह, 'व्हॅलेंटाईन्स डे'ला शाळेत विद्यार्थिनींना शपथ
Follow us
| Updated on: Feb 14, 2020 | 12:23 PM

अमरावती : प्रियकर-प्रेयसी आपल्या मनातील प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ची हमखास निवड करतात. मात्र या जागतिक प्रेमदिनी अमरावतीच्या शाळेतील विद्यार्थिनींना वेगळीच शपथ देण्यात आली. प्रेम, प्रेम विवाह किंवा हुंडा घेऊन लग्न न करण्याचा निश्चय (Valentines Day Girl Students Oath) विद्यार्थिनींनी केला.

तरुण वयातील मुलामुलींच्या प्रेम प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हुंडा घेण्याची पद्धतही वाढीला लागली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अनोखा निर्धार केला. ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने या विद्यार्थिनींनी प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ घेतली.

‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’ अशी शपथ विद्यार्थिनींकडून घेण्यात आली.

हेही वाचा : कै. विश्वासघातकी, शोकाकुल आत्मक्लेश! मुलगी पळून गेल्याने बापाने गावभर फलक लावले!

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आपला निर्णय उपयुक्त ठरेल, असा विश्वास विद्यार्थिनींनी व्यक्त केला आहे. अमरावतीच्या मुलींचा आदर्श घेण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडाच्या पार्श्वभूमीवर या शपथेला वेगळं महत्त्व आलं आहे.

अमरावतीच्या टेंभुर्णी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबीरात मुलींनी हात समोर ठेवत हिंगणघाट घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहिली. एकीकडे 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन्स डे हा प्रेमाचा दिवस साजरा केला जात असताना, त्याच्या पूर्वसंध्येला मुलींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ (Valentines Day Girl Students Oath) घेतली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.