व्हॅलेन्टाईन विशेष : कॅन्सरग्रस्त तरुणाशी तुम्ही लग्न कराल का? रत्नागिरीच्या सोनालीच्या प्रेमाला सलाम!!
रत्नागिरी : कॅन्सर या रोगाचं नाव ऐकताच पायाखालची जमीन सरकते. पण अशा भंयकर प्रसंगात एखाद्या जोडीदाराची साथ मिळणं तेवढंच अवघड आणि कठीण सुद्धा असतं. 14 फेब्रुवारी व्हॅलेटाईन डे. पण प्रेमाचं खरा आदर्श रत्नागिरीतल्या एका जोडप्याने समाजासमोर ठेवलाय. प्रथमेशला भयंकर असा कॅन्सरच्या आजारांनी ग्रासलं. पण पेशाने नर्स असणाऱ्या सोनालीने प्रथमेशला हा आजार आहे याची माहिती असून […]
रत्नागिरी : कॅन्सर या रोगाचं नाव ऐकताच पायाखालची जमीन सरकते. पण अशा भंयकर प्रसंगात एखाद्या जोडीदाराची साथ मिळणं तेवढंच अवघड आणि कठीण सुद्धा असतं. 14 फेब्रुवारी व्हॅलेटाईन डे. पण प्रेमाचं खरा आदर्श रत्नागिरीतल्या एका जोडप्याने समाजासमोर ठेवलाय. प्रथमेशला भयंकर असा कॅन्सरच्या आजारांनी ग्रासलं. पण पेशाने नर्स असणाऱ्या सोनालीने प्रथमेशला हा आजार आहे याची माहिती असून त्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं. या भयानक रोगावर मात करण्यासाठी सोनाली प्रथमेशच्या मागे प्रेमाची सावली (Valentines Day Cancer Patient Love Story) बनून उभी रहातेय.
14 फेब्रुवारी..व्हॅलेटाईन डे… जगभरातील प्रेमी युगुलांचा दिवस…प्रेम या शब्दाची व्याख्या सांगणारा हा दिवस. हा व्हॅलेटाईन डे जगभरात साजरा होत असताना, रत्नागिरीत एक आयडियल जोडपं आहे. प्रथमेश आणि सोनाली.
वयाच्या 20 व्या वर्षी प्रथमेशला ग्रंथींच्या कॅन्सरनी ग्रासलं. टोरोटोमा ट्युमरच्या (teratoma tumor) कॅन्सरनी प्रथमेशला हैराण केलं. रत्नागिरीतल्या हातखंबा इथल्या छोट्याशा गावात रहाणारा प्रथमेश. या आजाराची लागण झाल्याचं कळलं आणि हादरला..किमोथेरेपी घेऊन घरी परतलेल्या प्रथमेशची अवस्था त्याच्याच वाडीतील सोनालीनं पाहिली. सोनाली सुद्धा प्रथमेशच्या वयाचीच. पण एक नर्स असल्याने प्रथमेशला सोनालीनं समजून घेतलं. या रोगावर औषध उपचार सुरु असताना प्रथमेशला आधार दिला. त्याच्यासोबत उभी राहिली. टोरोटोमा ट्यूमरच्या कॅन्सरशी सामना करत असताना प्रथमेश आणि सोनाली एकमेकांना चांगले ओळखू लागले. आणि त्यामुळे सोनालीनं प्रथमेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज या दोघांच्या लग्नाला दीड वर्ष पूर्ण झाली. दोघे एकमेकांना समजून घेत सुखाने संसार करत आहेत.
प्रथमेशला त्याच्या कॅन्सरच्या उपचारासाठी आजपर्यत सात लाखांचा खर्च झाला. पण हा आजार माहित असून सुद्धा सोनालीनं प्रथमेशशी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. एकाच वाडीत राहणाऱ्या प्रथमेश आणि सोनालीने साधेपणाने विवाह केला. त्याच्या आजारात प्रथमेशला जोडीदाराच्या प्रेमाची साथ हवी होती म्हणून सोनालीनं मागचा पुढचा विचार न करता प्रथमेशशी विवाह केला. सोनाली स्वतः एक नर्स आहे. त्यामुळे या आजारात काय काळजी घ्यावी लागते हे तिला माहिती होते. त्याशिवाय प्रथमेशला आजार असणाऱ्या टोरोटोमा ट्युमरच्या कॅन्सरनी वैवाहिक आयुष्यात परिणाम करणारा होता. असं असताना हा धोका ओळखून सोनालीनं प्रथमेशला साथ दिली. प्रेमानं कुठलाही आजार बरा होवू शकतो या मानसिकतेनं घरातल्यांचा विरोध झुगारुन सोनालीनं हे पाऊल उचललं.
प्रथमेश आज अकाऊंटची कामं करतोय. सोनालीसोबत तो आपलं आयुष्य जगतोय. येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा आणि प्रेरणा देणाऱ्या दिवसानं कॅन्सरसारखा आजारावर प्रथमेश आणि सोनाली मात करण्याचा प्रयत्न करतायत. सोनालीच्या मागे आता प्रथमेशचे नातेवाईक सुद्धा खंबीरपणे उभं राहत आहेत.
प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं सांगितलं जातं. 14 फ्रेबुवारीला अनेक प्रेमीयुगुल एकमेकांवरच्या प्रेमाच्या आणाभाका घेतील पण माणूस म्हणून सोनालीनं तिच्या मनामधील दाखवलेली आपुलकी कुठल्याही इतर प्रेमासमोर नक्कीच फिकी (Valentines Day Cancer Patient Love Story) ठरणारी असेल.
हेही वाचा : मी आयुष्यात एकदाच प्रेम केलं, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांकडून कबुली