AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidarbha Flood | चंद्रपुरातील लाडज गाव महापुराच्या विळख्यात, 1200 ग्रामस्थ रात्रभर पुराच्या छायेत

राज्य आपत्ती निवारण दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल याठिकाणी पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत

Vidarbha Flood | चंद्रपुरातील लाडज गाव महापुराच्या विळख्यात, 1200 ग्रामस्थ रात्रभर पुराच्या छायेत
| Updated on: Aug 30, 2020 | 11:51 PM
Share

चंद्रपूर : चंद्रपुरातील पूरग्रस्त लाडज गावातून बोटींच्या साहाय्याने सुमारे पन्नास नागरिकांना हलवण्यात आले आहे (Ladaj Village Flood). राज्य आपत्ती निवारण दलाच्या जवानांसह जिल्हा आपत्ती निवारण पथकाच्या कर्मचार्‍यांना नागरिकांना हलवण्यात यश आलं आहे. मात्र, वायूदलाच्या हेलिकॉप्टरला सध्यातरी बचावकार्यात अपयश आलं आहे. तरीही लाडज गावातील सुमारे 1200 च्यावर नागरिक रात्रभर पुराच्या छायेत असणार आहेत (Ladaj Village Flood).

मध्यरात्रीनंतर गोसेखुर्द प्रकल्पातील विसर्ग थोडा कमी होणार आहे. लाडज गावातून सुटका केलेल्या नागरिकांची ब्रह्मपुरी येथे भोजन-निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह वरिष्ठ महसूल आणि पोलीस अधिकारी ब्रह्मपुरीच्या पूरग्रस्त भागात पोहोचले आहेत.

गोसेखुर्द धरणाचे पाणी वेगाने वैनगंगा नदीत येत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या 10 गावांना महापुराने वेढले आहे. यातील लाडज, चिखलगाव, बेलगाव, बेटाळा, पिंपळगाव या गावांमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. राज्य आपत्ती निवारण दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल याठिकाणी पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत (Ladaj Village Flood).

यात सर्वाधिक बिकट परिस्थिती वैनगंगा नदीत बेटस्वरुप असलेल्या लाडज या गावाची आहे. 1300 लोकसंख्या असलेलं हे गाव सध्या महापुराने जलमय झालं आहे. गावात 10 ते 12 फूट पाणी असून हे पाणी वेगाने वाढत आहे. अशा परीस्थितीत या गावातील नागरिकांना महापुरातून बाहेर काढण्यासाठी एकीकडे बोटीच्या सहाय्याने प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे वायू दलाच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांना एयरलिफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, तो अयशस्वी ठरला आहे.

दुसरीकडे, बोटीने सुटका झालेल्या नागरिकांना ब्रह्मपुरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भोजन आणि निवास व्यवस्था उपलब्ध करुन दिली जात आहे. सध्या सुमारे 50 नागरिकांना लाडज गावातून सुखरुपपणे ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले आहे. आज रात्री लाडज या गावातील परिस्थिती कल्पनेपेक्षाही वाईट होऊ शकते. प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे.

Ladaj Village Flood

संबंधित बातम्या :

Gosekhurd Dam | गोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वाधिक विसर्ग, नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain | राज्यात दमदार पावसाने खडकवासलासह अनेक धरणं भरली, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.