AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Walmik Karad News : धनंजय मुंडेंचे आशीर्वाद आहेत म्हणूनच कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar Statement : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असून ही ट्रीटमेंट मंत्री धनंजय मुंडे यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच मिळत असतील असं कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हंटलं आहे.

Walmik Karad News : धनंजय मुंडेंचे आशीर्वाद आहेत म्हणूनच कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Feb 28, 2025 | 1:08 PM

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट ही मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे मिळत आहे, असा आरोप कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं. वाल्मीक कराडला ही ट्रिटमेंट मिळण्यामागे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर आज विजय वडेट्टीवार यांनी देखील वाल्मीक कराडला मिळणारी व्हीआयपी ट्रीटमेंट ही मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे मिळत असल्याचं म्हंटलं. ते म्हणाले की, वाल्मीक कराड याला कोणताही त्रास तुरुंगात होता कामा नये असा आदेश धनुभाऊंचा असेल, त्याच्याशिवाय कराडला अशी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळूच शकत नाही. त्यामुळेच मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी होत असेल तर ती पूर्ण व्हायला हवी. अन्यथा या आरोपींना शिक्षा होणार नाही. सध्या या प्रकरणातील आरोपींना अभय देण्याचं काम सुरू आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला.
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर.
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?.
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात.
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं...
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं....
आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात...
आधी पाकला छुपा पाठिंबा, आता तुर्कस्तान म्हणतंय, चांगल्या वाईट काळात....
तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
तेव्हा मला अजित दादांकडून ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट.