Washim Labors | गावची शाळा नटवली, तुटलेल्या फरशा बसवल्या, वर्ग खोल्या सजवल्या, क्वारंटाईन मजुरांकडून सदुपयोग
वर्ग खोल्यांची निघालेली फरशी बसविणे, शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती या मजुरांकडून कुठल्याही मोबदल्या विना करण्यात येत आहे.
वाशिम : कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र टाळेबंदी (Washim Labors Quarantine Work) करण्यात आल्याने रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेला ग्रामीण भागातील मजूर वर्ग आपापल्या गावी परतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बऱ्याच ठिकाणी या स्थलांतरित मजुरांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र, वाशिम जिल्ह्यात विलगीकरणात असलेल्या या कष्टकऱ्यांकडून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीचे डागडुजीसह सुशोभिकरणाचे काम हाती (Washim Labors Quarantine Work) घेण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी महानगरात गेलेले हजारो मजूर आपल्या मूळगावी परतले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना शाळा आणि इतर इमारती संपादित करुन त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील पार्डी टकमोर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आलेल्या या कष्टकऱ्यांकडून एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आपल्याकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळा इमारत आणि परिसराची स्वच्छता हे (Washim Labors Quarantine Work) मजूर करत आहेत.
पार्डी या गावातील विनोद घोडके, रामदास गव्हाणे, विजय घोडके, विनोद घोडकेची पत्नी यांनी स्वतः होऊन 14 दिवस शाळेत राहण्याचा निर्णय घेतला आणि शाळेत राहताना शाळेची सफाईसुद्धा करत आहेत. झाडाला पाणी पण देत आहेत. हे सर्व सगळ्या समोर एक आदर्श ठरत आहेत.
वर्ग खोल्यांची निघालेली फरशी बसविणे, शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती या मजुरांकडून कुठल्याही मोबदल्या विना करण्यात येत आहे. शाळा प्रशासनाकडून रंग पुरविण्यात येणार असून शाळेच्या तब्बल 12 खोल्यांची रंगरंगोटी याच उपक्रमातून करण्यात येणार आहे. गावच्या शाळेप्रती असलेल्या आपुलकीच्या भावनेतून हा उपक्रम (Washim Labors Quarantine Work) राबविल्या जात आहे.
संबंधित बातम्या :
Kolhapur Corona | मुंबई-पुणेकरांनी कोल्हापूरची धाकधूक वाढवली, गावी परतणाऱ्यांचा लोंढा