ममता बॅनर्जींचा असदुद्दीन ओवेसींना झटका, अनेक नेत्यांचा MIM ला रामराम ठोकत TMC मध्ये प्रवेश

एमआयएमने पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढण्याची घोषणा केली. मात्र, सोमवारी (23 नोव्हेंबर) टीएमसीने बंगालमधील AIMIM लाच भगदाड पाडलं आहे.

ममता बॅनर्जींचा असदुद्दीन ओवेसींना झटका, अनेक नेत्यांचा MIM ला रामराम ठोकत TMC मध्ये प्रवेश
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 6:14 PM

कोलकाता : बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar assembly election) असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाला 5 जागांवर विजय मिळाला. आता एमआयएमने पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढण्याची घोषणा केली. यामुळे टीएमसी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांची चिंता वाढली होती. मात्र, सोमवारी (23 नोव्हेंबर) टीएमसीने बंगालमधील AIMIM लाच भगदाड पाडलं आहे.

बंगाल एमआयएमच्या अनेक नेत्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास दाखवत बंगालमध्ये बिहार निवडणूक निकालाचा काहीही परिणाम होणार नाही, असा दावा केला. तसेच पश्चिम बंगालमधील मुस्लीम पूर्णपणे ममता बॅनर्जींसोबत असल्याचं म्हटलं. सोमवारी तपसिया येथील टीएमसी कार्यालयात टीएमसीचे मंत्री व्रात्य बसु आणि मलय घटक यांच्या उपस्थितीत एमआयएमच्या नेत्यांनी टीएमसीत प्रवेश केला. यात अनवर पाशा, मुर्शीद अहमद, सैयद रहमान, तारिक अजीज, शेख हबीबुल यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

पश्चिम बंगालमध्ये येऊ नका, एमआयएमच्या माजी नेत्यांचा ओवेसींना सल्ला

एमआयएममधून टीएमसीत प्रवेश केलेले नेते अनवर पाशा म्हणाले, “ओवेसींनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीत काय करावं यासाठी आमचा सल्ला मागितला होता. आम्ही त्यांना बंगालमध्ये न येण्याचा सल्ला देतो. बंगालमधील मुस्लीम सुखी आहेत. एमआयएम पश्चिम बंगालमध्ये येत असल्याने भाजपला त्यांचा फायदा दिसत आहे. मात्र, बंगालमधील मुस्लीम पूर्णपणे ममता बॅनर्जी यांच्यासोबत आहे. कारण ममता बॅनर्जी पूर्णपणे सेक्युलर आहेत. बंगालमध्ये 30 टक्के मुस्लीम आहेत. जर बंगालला अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. बंगालमध्ये धर्मांधतेला जागा मिळणार नाही यासाठी आम्ही आमची संपूर्ण ताकद लावू.”

संबंधित बातम्या :

पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यास ‘लव जिहाद’वर कायदा करणार : खासदार लॉकेट चटर्जी

भाजप इलेक्शन मोडवर,अमित शाहांचे मिशन बंगाल तर जे.पी.नड्डांची भारत प्रवास यात्रा

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीआधी राष्ट्रपती शासन लागू करा, भाजपची मागणी

West Bengal election 2021 many leaders of AIMIM joins TMC

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.