देशातील राजकारणाचा पारा वाढवणारी जम्मू-काश्मिरची गुपकर आघाडी काय आहे?

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवून विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयाविरोधात तेथे सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लरेशनची (पीएजीडी) घोषणा केली.

देशातील राजकारणाचा पारा वाढवणारी जम्मू-काश्मिरची गुपकर आघाडी काय आहे?
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 12:10 AM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवून विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयाविरोधात तेथे सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लरेशनची (पीएजीडी) घोषणा केली. हे एक प्रकारचं घोषणापत्र आहे. या घोषणापत्रातील मागण्या मान्य करुन घेण्यासाठी तयार केलेल्या सर्वपक्षीय आघाडीलाच गुपकर आघाडी नाव देण्यात आले आहे. गुपकर हे श्रीनगरमधील एका मुख्य रस्त्याचं नाव आहे. या ठिकाणी सर्वच प्रमुख नेत्यांचे निवासस्थानं असून जम्मू काश्मीरचे बहुतांश मोठी प्रशासकीय कार्यालयं देखील याच भागात आहेत. त्यामुळेच गुपकर या नावाला अधिक महत्व प्राप्त झालंय (What is Gupkar Alliance of Jammu Kashmir ).

गुपकर आघाडीत नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षाशिवाय (पीडीपी) जम्मू काश्मीरमधील अन्य सर्व विरोधीपक्ष सहभागी आहेत. नुकतीच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांना गुपकर घोषणापत्र आघाडीचे (पीएजीडी) अध्यक्ष आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) नेते युसूफ तारिगामी या आघाडीचे संयोजक आहेत, तर पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन त्याचे प्रवक्ते आहेत. ही आघाडी स्थापन झाल्यानंतर त्याची पहिली बैठक मेहबूबा मुफ्ती यांच्या निवासस्थानावर झाली. यावेळी जम्मू काश्मीरला विशेष राज्यांतर्गत मिळालेल्या जुन्या झेंड्यालाच या आघाडीने आपला झेंडा घोषित केलं आहे.

दरम्यान, गुपकर आघाडी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं संविधानातील कलम 370 हटवल्यानंतर मागील 1 वर्षात राज्यात कसा कारभार झाला यावर एक श्वेतपत्रिका काढणार आहे. प्रशासनाच्या कारभाराचा लेखाजोखा मांडणारी ही श्वेतपत्रिका 1 महिन्यात तयार करण्यात येणार आहे. यात आकडेवारींसह अनेक मुद्द्यांवर गंभीर भाष्य केलं जाणार आहे.

गुपकर आघाडीने म्हटलं, “ही श्वेतपत्रिका जम्मू-काश्मीरबद्दल देशातील लोकांसमोर आकडेवारी आणि तथ्यांसह सत्य मांडेल. जम्मू-काश्मीरमध्ये भ्रष्टाचार आहे असं एक चित्र उभं केलं जातं. हे चित्र गुपकर आघाडीच्या श्वेतपत्रिकेतून साध्य होईल.”

गुपकर आघाडीवर भाजपकडून देशविरोधी असल्याचाही आरोप झाला. मात्र, आघाडीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी ही आघाडी काश्मीरच्या विशेष दर्जासाठी तयार करण्यात आली आहे. ही आघाडी भाजपविरोधी आहे, मात्र देशविरोधी नाही.”

संबंधित बातम्या :

पीडीपीसोबत सत्ता का उपभोगली? दाऊदची बायको मुंबईत कशी आली? शाहांच्या ‘गुपकार गँग’ आरोपानंतर काँग्रेसचे सवाल

गरिबांना खायला अन्न नाही, पण हे त्यांना जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करायला सांगतात : मेहबुबा मुफ्ती

जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही, मेहबुबा मुफ्तींचे वक्तव्य, भाजपची अटकेची मागणी

What is Gupkar Alliance of Jammu Kashmir

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.