कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

मानवजातीच्या मुळावर उठलेल्या कोरोनाला संपवण्याचे अनेक प्रयत्न सुरु आहेत.

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट
ब्रिटनमध्ये आता नवीन व्हेरिएंट AY.4.2 ची भीती
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 2:36 PM

मुंबई : कोरोना आता कुठं अंताच्या दिशेनं वाटचाल करतोय. लस येताच कोरोनाचा खात्मा होईल. असं आपण म्हणतोय, पण कोरोना काही जाण्याचं नाव घेत नाही. कुठल्या ना कुठल्या नव्या रुपात कोरोना आव्हान देतोय. मानवजातीच्या मुळावर उठलेल्या कोरोनाला संपवण्याचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. मात्र, यशाचा प्रकाश दिसण्याआधीच पुन्हा कोरोनाच्या भयाण अंधाराची सावली पडतेय. (What is the new strain of corona spreading in Britain)

कोरोना कुठल्या नव्या रुपात आला आहे?

ब्रिटनमध्ये कोरोनानं पुन्हा कमबॅक केला आहे. कोरोना स्ट्रेन नावानं याला ओळखलं जात आहे. या विषाणूला अद्याप कुठलंही नाव ठेवण्यात आलेलं नाही. मात्र याचा फैलाव कोरोनाहून कित्येक पटीनं अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये यानं पाय पसरायला सुरुवात केली. आता या विषाणूनं आक्राळ-विक्राळ रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. शास्रज्ञांच्या म्हणणानुसार कोरोना विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक प्रमाणात याचा संसर्ग सुरु आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर कोरोना लस प्रभावी ठरेल?

2020च्या वर्षात कोरोना आला, त्यानं पाय पसरले, सगळ्या जगाला कवेत घेतलं, सगळं जग ठप्प केलं, अनेकांनी जीव गमावला, आता 2020 च्या शेवटी कोरोना लस तयार झाल्या आहेत. लवकरच या लस अनेकांना टोचल्या जातील. मात्र या लस कोरोना लस कोरोना स्ट्रेनवर प्रभावी ठरलीत? याच प्रश्नाचं उत्तर आता शास्रज्ञ शोधत आहेत. ब्रिटीश शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नवीन कोरोना स्ट्रेनवर सध्याची कोरोना लस प्रभावी ठरेल. ही लस लोकांची प्रतिकारशक्ती वाढवणार आहे. त्यामुळं कोरोनाचा सामना ते सहजरितीने करु शकतात. मात्र, कोरोनाचे नवनवे स्ट्रेन येत राहिले तर ती डोकेदुखी ठरु शकते असंही तज्ज्ञांचं मत आहे.

भारतासाठी हा कोरोना स्ट्रेन डोकेदुखी ठरणार?

ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळं भारताची चिंता वाढली आहे. यामुळंच ब्रिटनहुन येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. ICMRच्या संचालकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नव्या कोरोना स्ट्रेनचा संसर्ग पसरण्याचा दर कोरोनाहून कित्येक पटीनं अधिक आहे. त्यामुळं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. इंग्लडमध्ये सध्या कडक पद्धतीनं कोरोना नियम राबवले जातील. त्यामुळं तिथले भारतीय नागरिक पुन्हा स्वगृही परतू शकतात. त्यामुळं भारतानं अधिक काळजी घ्यावी

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची माहिती समोर येताच, सगळ्या जगात खळबळ माजली आहे. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं रद्द केली आहे. विमानतळांवर कोरोना चाचण्या सुरु आहेत. हा स्ट्रेन जगभर पसरु नये यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करतोय. त्यामुळं भारतानंही ही गोष्टी गांभीर्यांनं घेणं गरजेचंय, अन्यथा कोरोनाच्या कहरापुढं कुणीही काहीही करु शकणार नाही. (What is the new strain of corona spreading in Britain)

संबंधित बातम्या – 

Special Report | राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं, अनेक जिल्ह्यातून कोरोना हद्दपार

Special Report | महाराष्ट्रात कोरोना लसीची महातयारी

(What is the new strain of corona spreading in Britain)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.