कधी आहे शुक्र प्रदोष व्रत? जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त
प्रदोष व्रताचे महत्व शिवपुरणात सांगण्यात आले आहे. शुक्रवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शुक्र प्रदोष व्रत असे म्हणतात. या दिवशी महादेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. डिसेंबर मध्ये शुक्र प्रदोष व्रत कधी आहे याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. जाणून घेऊया कधी आहे शुक्र प्रदोष व्रत.
हिंदू पंचांगानुसार दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला शुक्र प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते की या दिवशी महादेवांची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. जाणून घेऊया या महिन्यांमध्ये शुक्र प्रदोष व्रत कधी आहे आणि पूजेचा मुहूर्त कोणता आहे.
वैदिक पंचांगाप्रमाणे दर महिन्यामध्ये जसे दोन प्रदोष व्रत असते त्याचप्रमाणे डिसेंबर मध्येही दोन प्रदोष व्रत आहेत. डिसेंबर महिन्यातील पहिले प्रदोष व्रत मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले जाईल. मार्गशीर्ष महिन्यातील हे दुसरे प्रदोष व्रत असेल. मात्र यावेळी मार्गशीर्ष शुक्ल प्रदोष व्रताच्या तिथी बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. मार्गशीर्ष शुक्ल प्रदोष व्रत हे १२ डिसेंबरला होणार की 13 नोव्हेंबरला होणार हा संभ्रम आहे.
डिसेंबरमधील शुक्र प्रदोष व्रत
पंचांगानुसार या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी १२ डिसेंबर रोजी 10:26 मिनिटांनी सुरू होईल आणि 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:40 मिनिटांनी संपेल. यानुसार उदय तिथीनुसार शुक्र प्रदोष 13 डिसेंबरला असेल.
शुक्र प्रदोष पूजा मुहूर्त
अभिजीत मुहूर्त: 13 डिसेंबरला सकाळी 11:55 ते दुपारी 12:36 पर्यंत आहे.
शुभ मुहूर्त: 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:26 पासून सुरू होऊन 7: 40 पर्यंत आहे.
शुक्र प्रदोष शुभ योग
या प्रदोषाच्या वेळी तीन शुभ योग आहेत. रवी योग: 13 डिसेंबर रोजी सकाळी 7: 50 ते 14 डिसेंबर रोजी सकाळी 5:48 पर्यंत आहे.
ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहे की रवी रोग तयार झाल्यास सूर्याचा प्रभाव वाढतो. ज्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात. 13 डिसेंबरला शिवयोग आणि सिद्ध योग दोन्हीही योग तयार होत आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)