अगा हे काय विपरित घडलं, पोलिसांची जिल्हाधिकाऱ्यावरच लाठी…
पोलिस जेव्हा हातघाईला येतात तेव्हा ते कोणालाही जुमानत नाहीत. याचा अनुभव फिल्ड रिपोर्टींग करणाऱ्या पत्रकारांना नेहमीच येत असतो.
पोलीस आवेशात कधी काय करतील याचा नेम नाही. आपल्या येथे बदलापूर येथील झालेले आंदोलन पोलिसांची सत्वपरिक्षा पाहणारे ठरले. कारण इतका मोठा मॉब रेल्वे रुळांवर उतरला असताना त्यातच रुळांवरची बलास्ट खडी हाताला सहज गावत असताना बंदुकीच्या गोळ्या प्रमाणे वेगाने येणारे दगड चुकवायचे की महिलांना लागू नये, प्रवाशांना लागू नये याची दक्षता घ्यायची या कात्रीत साडलेल्या पोलिसांची खरी दमछाक राजकीय आंदोलन हाताळताना होत असते. कारण पोलिस हे हे एसटी, रेल्वे आणि बस प्रमाणे सॉफ्ट टार्गेट असतात. लाठीमार केला तरी बदली…निलंबन आणि नाही केला तरी तेच त्यामुळे पोलिसांची ड्यूटी नेहमीच अडचणीत येत असते. एससी आणि एसटी वर्गीकरणाचा सर्वोच्च न्यायालयाने पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनातील पोलिसांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून तुम्हाला कल्पना येईल की पोलिस तणावात काय गडबड करु शकतात…ते
पोलिसांच्या ड्यूटी नेहमीच तलवारीच्या पात्यांवर चालणारी असते. कारवाई केली तर मरण, आणि नाही केली तरी दुप्पट मरण अशा दुविधेत सापडेल्या पोलिसाचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भारत बंदचा बंदोबस्त करताना एका निमलष्करी जवानाने थेट कलेक्टरवरच दांडुका उगारला. बिचारा जिल्हाधिकारी पोलिसांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरुन ड्यूटी बजावत होता. परंतू आंदोलकांना हटविण्याच्या घाईत त्याने जिल्हाधिकाऱ्याच्या पाठीत लाठी घातली. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्याने आणि खुद्द जिल्हाधिकाऱ्याने चूक त्याच्या निदर्शनास आणून दिली. परंतू तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि पाठीतूनही कळा येत होत्या. काय करणार ?
येथे पाहा व्हिडीओ –
पाटण्यातला व्हिडिओ आहे
भारत बंद आंदोलकांना पांगवताना पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांवरच लाठी. pic.twitter.com/pWW0v5EGFU
— Prashant Kadam (@_prashantkadam) August 21, 2024
फ्रिलान्सर पत्रकार प्रशांक कदम यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘भारत बंद’ दरम्यान पाटणा येथे शुट केलेला आहे. बिहारच्या पाटणा येथे ‘भारत बंद’रस्त्यावरील आंदोलकांना हाकलताना एका पोलिस जवानाने थेट जिल्हाधिकाऱ्यांचा पाठीतच दांडका घातला.त्यानंतर त्याच्या लक्षात चुक आली.’भारत बंद’भाजपच्या एनडीए आघाडीचे सरकार असलेल्या हिंदी भाषिक राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाने मंत्रालय समोर आंदोलनाचा प्रयत्न करुन पाहिला. परंतू बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश अशा राज्यात मोठे आंदोलन झाल्याचे उघडीकस आले आहे.