उद्धव ठाकरे यांना महायुतीत घेणार ? फडणवीस आणि बावनकुळे यांनी काय सांगितलं ?

याच निवडणुकीच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं. उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये सध्या विस्तव जात नाही. त्याच मुद्यावरून फडणवीस यांनी हे भाष्य केले. उद्धव ठाकरे आले तर सोबत घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा फडणवीस यांनी

उद्धव ठाकरे यांना महायुतीत घेणार ? फडणवीस आणि बावनकुळे यांनी काय सांगितलं ?
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 1:18 PM

मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले असून लोकसभा निवडमूक काही महिन्यांवर आली आहे. त्यासोबत विधानसभा निवडणूकही घेतली तर राज्यातील मतदारांचा कल काय असेल याबाबत एक सर्व्हे घेण्यात येत आहे. तो पूर्ण झाल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल. या निवडणुकीत महायुती वि. महाविकास आघाडी असे युद्ध असेल . दरम्यान याच निवडणुकीच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं. उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये सध्या विस्तव जात नाही. त्याच मुद्यावरून फडणवीस यांनी हे भाष्य केले. उद्धव ठाकरे आले तर सोबत घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात नकार दर्शवला,

काय म्हणाले फडणवीस ?

उद्धव ठाकरे आमच्या सोबत येऊ शकत नाही. त्यांनीच, त्यांच्या बोलण्याने सगळी दारं बंद केली आहेत. त्यांनी आमचं मन दुखावले आहे. ते खालच्या खावली आहेत… खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात, पंतप्रधान मोदींनाही ते सोडत नाहीत. त्यामुळेच मनं दुखावली गेली आहेत, असे सांगत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा रस्ता बंद असल्याचे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंसाठी आमचे दरवाजे बंद

दरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही फडणवीस यांच्या बोलण्याला दुजोरा दिला आहे. ‘देवेंद्रजी म्हणतात ते खरंच आहे. ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, जे देवेंद्रजींबद्दल, हिंदुत्वाबद्दल बोलले. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, स्टॅलिन सोबत त्यांनी युती केली अशा धोकेबाज लोकांसोबत कोण राहील ? गद्दार लोकांसोबत कोण राहील ? आमचे दरवाजे आता उद्धवजींसाठी बंद आहेत. त्यांनी देवेंद्रजींचं खूप मन दुखावले आहे हे मी जवळून बघितलं आहे.

देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना नेहमी मान दिला. ते त्यांना मातोश्रीवर जाऊन भेटायचे. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते देवेंद्रजी करायचे, त्यांचा कोणताही शब्द देवेंद्रजींनी खाली पडू दिला नाही. मात्र एवढं करूनही जेव्हा एखादी व्यक्ती धोका देते, तेव्हा दुःख होते तशाच वेदना देवेंद्रजींनाही झाल्या आहेत. त्यांचं एवढं मन दुखावलं गेलं आहे. उद्धव ठाकरेंनी केवळ पॉलिटिकल खंजीर खुपसला नाही तर देवेंद्रजींना वेदनाही दिल्या आहेत’ असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट केले.

मोदीजी आणि देवेंद्रजींना टार्गेट करून आणि आमच्या पक्षासाठी कमरेखालची भाषा वापरली. सकाळी नऊ वाजताचा लाऊड स्पीकर लावून (संजय राऊत) शिवीगाळ करणे, सामनातून लिहिणे याला उद्धवजीचं खुले समर्थन असणे या सगळ्या कृती सहन करण्याच्या पलीकडल्या आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.