Team india : कष्टाचं फळ मिळालंच! 21 वर्षाच्या पोराची टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 संघामध्ये निवड

21 वर्षाच्या युवा खेळाडूच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 संघात या तरण्या पोराची निवड झाली आहे. आयपीएल गाजवल्यानंतर या खेळाडूचं नशीब फळफळलं आहे.

Team india : कष्टाचं फळ मिळालंच! 21 वर्षाच्या पोराची टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 संघामध्ये निवड
वनडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी निवडलेले बहुतांश खेळाडू विश्वचषक संघात दिसणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 4:22 PM

मुंबई : बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने या संघामध्ये युवा खेळाडूंना संधी दिली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. जाहीर झालेल्या संघामध्ये 21 वर्षाच्या युवा खेळाडूच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 संघात या तरण्या पोराची निवड झाली आहे. आयपीएल गाजवल्यानंतर या खेळाडूचं नशीब फळफळलं आहे.

कोण आहे हा खेळाडू?

टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 मध्ये संघामध्ये निवड झालेला हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून यशस्वी जयस्वाल आहे. वयाच्या 21 वर्षी टीम इंडियाच्या कसोटी आणि संघात निवड होणं म्हणजे खायची गोष्ट नाही. पठ्ठ्याच्या मेहनतीला यश आलं असून काही दिवसात टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.

या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह इतरांचा समावेश आहे.  त्यामुळे हार्दिक पंड्या विंडिज विरुद्धच्या या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मुंबईकर सूर्यकुमार यादव याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा या दोघांची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.

टीम इंडिया टी-20 संघ : इशान किशन (W), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव (VC), संजू सॅमसन (W), हार्दिक पांड्या (C), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज वेळापत्रक

पहिला सामना, 3 ऑगस्ट.

दुसरा सामना, 6 ऑगस्ट.

तिसरा सामना, 8 ऑगस्ट.

चौथा सामना, 12 ऑगस्ट.

पाचवा सामना – 13 ऑगस्ट.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.