यवतमाळमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 47 लाखांचा मुद्देमाल जप्त, 38 जणांना अटक
यवतमाळमध्ये उमरखेडमधील सदानंद वॉर्डातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली (Yavatmal Raid People Arrested during Gambling)
यवतमाळ : यवतमाळमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. यात अनेक प्रतिष्ठित बडे व्यापारी आणि नागरिकांना जुगार खेळताना अटक केली आहे. या जुगारात जवळपास 38 जुगाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत 9 लाख 38 हजार 970 रोख रक्कम जप्त केली आहे. उमरखेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. (Yavatmal Raid People Arrested during Gambling)
सहायक पोलीस अधिक्षकांना उमरखेडमधील सदानंद वॉर्डातील नितीन बंग यांच्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत नांदेड आणि उमरखेडमधील 38 प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, नेते जुगार खेळताना आढळून आले.
या कारवाईत 9 लाख 38 हजार 970 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर 65 मोबाईल, 4 मोटर सायकल, तीन चार चाकी वाहन आणि इतर साहित्य असा एकूण 47 लाख 34 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे यांनी गुन्हा नोंद केला आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. मागील अनेक दिवसापासून नितीन बंग यांच्या घरी मोठ्या प्रमाणात जुगार भरत असल्याची माहिती पोलिसांना होती. तर लॉकडाऊनच्या काळात नांदेड येथील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक येथे जुगार खेळायला येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. (Yavatmal Raid People Arrested during Gambling)
7 राज्यांमध्ये दरोडे, 33 कोटींच्या लुटीचा संशय, पुण्यात महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या 7 आरोपींना जवळपास 5 कोटी मुद्देमालासह बेड्याhttps://t.co/1UV9tKIdjx#Dacoit #Robber #Pune @PuneCityPolice @puneruralpolice @Info_Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2020
संबंधित बातम्या :
पुण्यात गांजा-चरस तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या, 2 कोटी 10 लाखाचा मुद्देमाल जप्त
पुण्यात महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, जवळपास 5 कोटी मुद्देमालासह 7 आरोपींना बेड्या