AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI बनवतंय बनावट आधार कार्ड ? जाणून घ्या खरी आणि नकली ओळख कशी कराल

AI चा योग्य वापर समाजासाठी फायदेशीर ठरू शकतो, मात्र त्याच तंत्रज्ञानाचा गैरवापर गंभीर परिणाम घडवू शकतो. विशेषतः नागरिकांच्या वैयक्तिक माहितीसंबंधी सुरक्षिततेवर मोठा धोका निर्माण होतो. म्हणूनच, डिजिटल युगात प्रत्येकाने आपल्या ओळखीची आणि वैयक्तिक डेटाची काळजीपूर्वक निगराणी ठेवणे गरजेचे आहे.

AI बनवतंय बनावट आधार कार्ड ? जाणून घ्या खरी आणि नकली ओळख कशी कराल
| Edited By: | Updated on: Apr 11, 2025 | 2:28 PM
Share

तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे अनेक नवीन शक्यता समोर येत आहेत. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे क्षेत्र इतक्या वेगाने प्रगत होत आहे की, त्याचा उपयोग आता केवळ उद्योग, शिक्षण किंवा सर्जनशील कामापुरता मर्यादित राहिलेला नाही. अलीकडे AI च्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या बनावट आधार कार्डाच्या प्रकरणाने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. एका LinkedIn युजरने ChatGPT चा वापर करून हे प्रयोग करताच समोर आलेल्या निष्कर्षांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना दाखवते की, AI चा गैरवापर होऊ लागल्यास तो आपल्या दैनंदिन सुरक्षेवर आणि गोपनीयतेवर थेट परिणाम करू शकतो.

आधार कार्ड भारतातील प्रत्येक नागरिकाची ओळख सिद्ध करणारा १२ अंकी युनिक ओळख क्रमांक ही एक महत्त्वाची ओळख आहे. ही ओळख बायोमेट्रिक व डेमोग्राफिक डेटावर आधारित असते. सरकारच्या योजनांपासून ते बँक खात्यांपर्यंत अनेक सेवा यावर आधारित असतात. पण जर हीच ओळख बनावट करता आली, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

AI च्या मदतीने तयार झालेल्या बनावट आधार कार्डात अनेक गोष्टी वेगळ्या असतात जसे की फोटोमध्ये अस्पष्टता, फॉन्टचा संरेखन वेगळं असणं, विशेष चिन्हांचा चुकीचा वापर, तसेच लोगोच्या गुणवत्तेमध्ये फरक. हे सगळे संकेत आपल्याला सांगतात की कार्ड बनावट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी कोणतीही शंका आल्यास लगेच UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन (https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar) आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून पडताळणी करणं आवश्यक ठरतं.

अस्सल आणि बनावट आधार कार्ड वेगळं ओळखण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे QR कोड स्कॅन करणे. खऱ्या कार्डाचा QR कोड स्कॅन केल्यावर UIDAI डेटाबेसशी जुळणारी माहिती मिळते. ज्यात नाव, राज्य व लिंग यांचा समावेश असतो. बनावट QR कोड स्कॅन केल्यावर त्रुटी दाखवली जाते किंवा चुकीची माहिती दिसते.

तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी UIDAI ने दिलेली ‘Virtual ID’ (VID) सुविधा ही अतिशय उपयुक्त आहे. ही १६ अंकी तात्पुरती ओळख केवळ आधारधारक स्वतः तयार करू शकतो. ती कुठल्याही इतर अ‍ॅप किंवा संस्थेमार्फत तयार होऊ शकत नाही. एकदा VID तयार झाल्यावर ती थेट रजिस्टर्ड मोबाइलवर SMS द्वारे पाठवली जाते. यामुळे तुमचा मूळ आधार क्रमांक सुरक्षित राहतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.