Hair Care Diet : पांढऱ्या केसांमुळे हैराण आहात? मग आहारात या पदार्थांचा करा समावेश
काही अहवालांनुसार, केसांमध्ये मेलेनिन नावाचे रंगद्रव्य आहे. हे वाढत्या वयासोबत कमी होऊ लागते. यामुळे केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. (Annoyed by white hair, Then include these foods in the diet)
मुंबई : आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. धावपळीच्या दिनचर्येमुळे आपल्याला आपले सौंदर्य, त्वचा, केस याकडे विशेष लक्ष देणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत त्वचेसह सर्वाधिक भेडसावणारी समस्या म्हणजे पांढरे केस. हल्ली तरुणांमध्येही केस पांढरे होण्याची समस्या अधिक वाढली आहे. यासाठी आपण आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करुन आपल्या केसांचे संरक्षण करु शकतो. यासाठी आपण आहारात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन 12 बी समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता. काही अहवालांनुसार, केसांमध्ये मेलेनिन नावाचे रंगद्रव्य आहे. हे वाढत्या वयासोबत कमी होऊ लागते. यामुळे केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. (Annoyed by white hair, Then include these foods in the diet)
पालक
पालक एक हिरवी पालेभाजी आहे. त्यात अनेक पौष्टिक पदार्थ असतात. हे लोह समृद्ध आहे. याशिवाय यात फॉलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. जे केस पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करते. म्हणून, आपण आपल्या आहारात पालकचा समावेश करु शकता. पालक एक पौष्टिक आहार आहे जो आपल्याला आरोग्याच्या इतर अनेक समस्यांपासून दूर ठेवतो.
कडीपत्ता
कडीपत्ता त्याच्या सुगंध आणि चव या दोहोंसाठी लोकप्रिय आहे. कढीपत्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक प्रकारच्या डिशमध्ये याचा वापर केला जातो. कडीपत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. हे केस पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करते.
ब्लूबेरी
ब्लूबेरी एक स्वादिष्ट फळ आहे. याचा ज्यूस आणि इतर अनेक पदार्थांमध्ये वापर केला जातो. यात अनेक पोषक तत्वे असतात. जे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते. ब्लूबेरी कर्करोगासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंधित करते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन बी 12, आयोडीन आणि झिंक आहे. हे आपले केस पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करते. म्हणून, केस पांढरे होण्यापासून टाळण्यासाठी आपण आपल्या आहारात ब्लूबेरीचा समावेश करू शकता.
ब्रोकोली
ब्रोकोलीची भाजी अनेकांना पसंत आहे. कोशिंबीरीप्रमाणे याचे सेवन केले जाते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ब्रोकोलीमध्ये फॉलिक अॅसिड असते. हे केस पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करते. (Annoyed by white hair, Then include these foods in the diet)
MCGM Recruitment 2021: मुंबई महापालिकेत 185 पॅरामेडिकल पदांसाठी भरती, 28 मेपर्यंत करा अर्ज#news #job #MCGMRecruitment2021 #MunicipalCorporationofGreaterMumbai #portal #mcgmhttps://t.co/8475c2FxxP
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2021
इतर बातम्या
रेल्वेच्या दोन पटरी जोडताना गॅप का ठेवला जातो? जाणून घ्या काय आहे कारण