फ्रीजमध्ये ठेवलेले टरबूज खात असाल तर सावधान, या आजारांना देताय आमंत्रण

Watermelon Benefits : टरबूज खायला अनेकांना आवडतं. टरबूज खाण्यासाठी खूप छान लागतं. पण तुम्हाला माहितीये का की फ्रीजमध्ये ठेवलेले टरबूज खाणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरु शकते. टरबूज खात असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जाणून घ्या फ्रीजमधील टरबूज खाण्याचे दुष्परिणाम.

फ्रीजमध्ये ठेवलेले टरबूज खात असाल तर सावधान, या आजारांना देताय आमंत्रण
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 6:50 PM

Watermelon Benefits : सध्या फ्रीजचा वापर खूप वाढला आहे. कोणतेही खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण त्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू जास्त काळ टिकतात. पण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली प्रत्येक गोष्ट योग्य असतेच असे नाही. बर्‍याच वेळा फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तूंची चव बदलते आणि त्याचा परिणाम आरोग्यावरही होतो. टरबूज हे देखील एक फळ आहे जे चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नये. त्याचे अनेक तोटे आहेत.

टरबूज रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे टाळावे

टरबूज रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर पौष्टिक मूल्य कमी होते. टरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास अन्नातून विषबाधा होण्याचा धोका देखील वाढतो. कापलेल्या टरबूजमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. हे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे चुकूनही टरबूज रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये.

टरबूज खाण्याचे फायदे

पाण्याची कमतरता भासत नाही

टरबूज खाल्ल्याने शरीराला हायड्रेट ठेवण्याचे मदत होते. टरबूज खाल्ल्याने पाण्याची कमतरता पूर्ण होते आणि तुमचे आरोग्य चांगले राहते.

वजन कमी करण्यास मदत

वजन कमी करायचे असेल तर टरबूज खाणे उपयुक्त ठरते. यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो.

पचन सुधारते

टरबूजमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आढळतात जे पचनासाठी मदत करतात.  यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही आणि त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते.

हृदयाच्या आरोग्याची काळजी घेते

टरबूज हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायद्याचे मानले जाते. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास टरबूज मदत करते आणि हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी कार्य करते.

आतड्यांसंबंधी रोग प्रतिबंधित करते

टरबूज अनेक प्रकारच्या आजारांपासून आतड्याचे संरक्षण करू शकते. त्यात व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स असते, जे आतड्यात चांगले बॅक्टेरियल फ्लोरा राखते. यातून अनेक फायदे होतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.