AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

beauty tips | फक्त ‘या’ 6 गोष्टी करा आणि मिळवा तजेलदार चेहरा

अशा काही टिप्स जाणून घेऊयात ज्यामुळे चेहऱ्याला ग्लो मिळेल. तसेच, चेहरा टवटवीत आणि तरुण वाटेल. (beauty healthy glowing skin)

beauty tips | फक्त 'या' 6 गोष्टी करा आणि मिळवा तजेलदार चेहरा
| Edited By: | Updated on: Dec 08, 2020 | 2:43 AM
Share

मुंबई : तजेलेदार आणि टवटवीत त्वचा असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी यावेळी अशा काही टिप्स जाणून घेऊयात ज्यामुळे चेहऱ्याला ग्लो मिळेल. तसेच, चेहरा टवटवीत आणि तरुण वाटेल. (beauty tips for healthy and glowing skin home remidy )

  1. त्वचा हायड्रेटेड ठेवा

जर आपली त्वचा हायड्रेटेड नसेल तर चेहरा कोमेजलेला वाटतो. हायड्रेटड नसेलेल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ शकतात. त्यामुळे हे सर्व टाळायचं असेल, तर सकाळी क्रीमने त्वचेला हायड्रेट करावं. तसेच, भरपूर पाणी पिल्यानेही चेहरा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

 2. त्वचा कशी आहे ते समजून घ्या

त्वचेची चमक वाढविण्यासाठी आपली त्वचा कशा प्रकारची आहे?, हे आधी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम आपला चेहरा तेलकट आहे, की कोरडा आहे हे समजणे गरजेचे आहे. तुमची त्वचा कोरडी असेल तर तिला हायड्रेटेड करणे गरजेचे आहे. तुमची त्वचा नाजूक असेल तर कठोर असणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळावा.

 3. टोनरचा वापर करा

क्लिंसिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंगसाठी चांगल्या प्रकारच्या टोनरचा वापर करावा. त्वचा स्वच्छ केल्यानंतर त्यावर टोनर लावावा. नंतर मॉइश्चरायझर लावावे. असे केल्याने त्वचेवरील ‘पीएच’ची पातळी व्यवस्थित राहील. तसेच चेहऱ्यावरील पोअर्स ( चेहऱ्यावरील छिद्र) लहान होतील.

4. स्क्रबिंग करणे विसरु नका

चेहऱ्यावरील मृत पेशींना काढून टाकण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा स्क्रबिंग करावे. नियमितपणे स्क्रबिंग केल्यामुळे रक्त प्रवाह (Blood Circulation) वाढतो. तसेच, चेहरा गुळगुळीत आणि मुलायम होण्यास मदत होते.

5. सनस्क्रीन वापरा

आपली त्वचा नाजूक असते. त्यामुळे त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करणे फार महत्वाचे आहे. त्वचेवर सूर्याची किरणं सातत्याने पडल्याने त्वचेवरील ग्लो कमी होतो. सनस्क्रीनमुळे डाग पडणे, सनटॅनिंग, सुरकुत्या अगदी कर्करोगापासूनही संरक्षण मिळू शकते. त्यामुळे सनस्क्रीनचा वापर करावा.

6. अन्नात अँटी ऑक्सिडंट्सचा समावेश करा

चेहऱ्याची बाहेरुन काळजी घेण्यासोबतच योग्य आहार घेणेही गरजेचे आहे. शरीराचे आतून पोषण होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. नैसर्गिक ग्लो मिळवायचा असेल, तर आहारात द्राक्षे, नट्स यांचा समावेश असावा. या सर्व गोष्टींचे पालन केल्यास तुम्हाला तुमची त्वचा तजेलेदार आणि टवटवीत वाटेल.

संबंधित बातम्या :

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

(beauty tips for healthy and glowing skin home remidy)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.