मुंबई : उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे त्वचा (Skin) निस्तेज आणि निर्जीव होते. अशा परिस्थितीत त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज असते. त्वचा थंड आणि ताजी ठेवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करा. यामुळे आपली त्वचा तजेलदार राहण्यासही मदत होते. कोरफड (Aloevera) अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरली जाते. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. सनबर्न, मुरुम, खाज आणि ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळण्यास कोरफड अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात (Summer) त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारे कोरफडचा वापर करू शकता. कोरफड नेमकी कशी त्वचेसाठी वापराची याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी एक चमचा कोरफड जेल घ्या. हे संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा. रात्री झोपण्यापूर्वी ते लावा, मानेला आणि चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर थेट आपला चेहऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळी धुवा. मात्र, चेहरा धुताना नेहमी थंड पाणी वापरावे. उन्हाळ्यात तुम्ही रोज याप्रकारे कोरफड जेल वापरू शकता.
एक कप कलिंगडचे बारीक तुकडे घ्या. त्यांना ब्लेंडरमध्ये टाकून चांगली पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कोरफड जेल मिक्स करा. हे चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 20 मिनिटे राहू द्या, नंतर साध्या पाण्याने धुवा, आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरा.
काकडी किसून घ्या. या किसलेल्या काकडीचा रस काढा. यामध्ये आता कोरफड जेल मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा. 15 ते 20 मिनिटे असेच राहू द्या त्यानंतर चेहरा धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील टॅन जाण्यास मदत होते.
एक चमचा मुलतानी माती घ्या. त्यात कोरफड जेल घाला आणि एकत्र मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेला लावा. 20 मिनिटे तसेच ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. या पॅक चेहऱ्याची चमक वाढवण्याचे काम करतो. हा पॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा लावायला हवा.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)