Turmeric For Skin: अंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाका, त्वचेच्या सगळ्या समस्या होतील दूर!

Turmeric water bath tips: हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हळदीचा वापर केल्याने शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट होतात. हळदीचा वापर अनेक कॉस्मेटिकप्रोडक्स मध्ये प्रामुख्याने केला जातो. चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर करण्यासाठी हळदीचा उपयोग अनेक वर्षांपासून केला जात आहे.

Turmeric For Skin: अंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाका, त्वचेच्या सगळ्या समस्या होतील दूर!
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 10:13 PM

मुंबई : आंघोळ करणे हा आपल्या दिनचर्येमधील एक महत्त्वाचा भाग आहे. आंघोळ केल्याने आपल्या शरीरावरील घाण पूर्णपणे दूर होऊन जाते सोबतच दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा (Energy in body) देखील टिकून राहते. आपल्यापैकी अनेकजण आंघोळ करतेवेळी आपली त्वचा सॉफ्ट व मुलायम बनवण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनाचा वापरदेखील करतात. बहुतेक वेळा बाजारातील उत्पादनाचा वापर केल्याने त्वचेवर विपरित परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतो. बाजारातील उत्पादने वापरण्या ऐवजी जर आपण घरगुती (Home remedies) काही उपाय केले तर आपली त्वचा नैसर्गिकरीत्या उजळू शकते व त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रासदेखील होणार नाही. हळदीचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये उपयोग सांगण्यात आलेला आहे. हळदीचा वापर करून आपण आपले जीवन समृद्ध बनवू शकतो. आंघोळ करते वेळी आपल्या त्वचेच्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी हळदीचा वापर अनेक जण करत असतात. आंघोळ करते वेळी पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद मिक्स करून आपण हळदीच्या पाण्याने आंघोळ केल्यास (Bathing tips) आपल्या शरीरावरील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचे घटक असते ज्यामुळे तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर ती जखम लवकर भरून निघते.

एवढेच नाही तर हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हळदीचा वापर अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये प्रामुख्याने केला जातो. या उत्पादनांचा वापर करून आपण डार्क सर्कल, कोरडी त्वचा, चेहऱ्यावरील सुरकुत्या लवकरच दूर करू शकतो, चला तर मग जाणून घेऊया हळदयुक्त पाण्याने आंघोळ केल्यास आपल्याला नेमकी काय काय फायदे होतात याबद्दल…

त्वचा उजळते

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्याचबरोबर करक्यूमिन नावाचे घटक देखील असतात त्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरीत्या उजळण्यासाठी मदत होते. जर तुम्ही आठवड्यातून तीन वेळा हळदीच्या पाण्याने आंघोळ करत असाल तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील व शरीरावरील ज्या काही मृतपेशी आहेत त्या पूर्णपणे दूर होऊन जातील आणि नैसर्गिकरित्या चेहऱ्यावर चमक येऊ लागेल. यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे आणि या पाण्याने अंघोळ करायची आहे.

जखम लवकर भरते

पूर्वी शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम झाली असल्यास जखम भरण्यासाठी हळदीचा वापर केला जायचा. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर ती जखम दूर होऊन जाते. अंघोळीचे पाण्यामध्ये नेहमी हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ केलेल्या शरीरावरील संपूर्ण त्रास समस्या दूर होऊन जातात तसेच तुमची त्वचा नेहमी टवटवीत राहते.

चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स दूर होतात

हल्ली तरुणांना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या वारंवार त्रास देत असते, अशा वेळी पिंपल्स समस्येपासून व काळे डाग कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आपण हळदीचा वापर करू शकतो. हळदी मध्ये अँटी सेप्टिक गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील लालसरपणा आणि बॅक्टेरिया कमी करण्यासाठी मदत होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा हळद पावडरचा वापर करायचा आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे.

या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी..

भलेही हळदीमध्ये आपली त्वचा कोमल मुलायम बनवण्याचे अनेक गुणधर्म असले तरी हळदीचा वापर करतेवेळी तज्ञ मंडळींचा सल्ला आवश्यक घ्यायला हवा. हळदीचा वापर मर्यादितच करायला पाहिजे अन्यथा तुमच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. हळदीचा वापर मर्यादेपेक्षा जास्त केल्यास शरीरावरील नाजूक अवयवांना इजा पोहोचू शकते. तज्ञ मंडळींच्या मते, शरीरावरील नाजुक अवयवांवर शक्यतो हळदीचा वापर करू नका.

टिप : या लेखातील माहिती सर्वसाधारणपणे सांगण्यात आलेली आहे. टीव्ही9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाही. जर तुम्हाला कोणताही उपाय करायचा असेल तर अशा वेळी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला अवश्य घ्या.

इतर बातम्या:

Raj Thackeray : ‘संजय राऊत… कॅमेरा आला की सुरु, कॅमेरा हटला की नॉर्मल’, राऊतांची नक्कल करत राज ठाकरेंची टोलेबाजी

Video : राज्यपालांना शिवराय कळलेत का? राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.