Beauty Tips : पावसाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा!

तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. याशिवाय त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तूप वापरू शकता.

Beauty Tips : पावसाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा!
तूप
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 10:43 AM

मुंबई : तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. याशिवाय त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तूप वापरू शकता. तूप त्वचा उजळण्याचे काम करते. या व्यतिरिक्त, ते त्वचेमध्ये वृद्धत्व विरोधी एजंट म्हणून काम करते. (Ghee is beneficial for eliminating the problem of dry skin)

कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी

जर तुम्ही कोरड्या त्वचेने त्रस्त असाल तर तुम्ही तूप वापरू शकता. यासाठी तुम्हाला तुपाचे काही थेंब हातावर घेऊन ते लावावे लागतील. त्वचेवर तूप लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा आणि चेहऱ्याभोवती एक थर तयार होईल जो त्वचा सुकू देत नाही.

सुरकुत्याची समस्या

जर तुम्हाला वाटत असेल की तूप फक्त अन्नाची चव वाढवण्यासाठी काम करते. तर हे चुकीचे आहे. तूप तुमच्या त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते, त्यात व्हिटॅमिन ई मुबलक असते. जे त्वचेतील वृद्धत्व विरोधी एजंट म्हणून काम करते. जर तुम्ही रोज तूप खात असाल तर तुमची त्वचा तरुण आणि सुरकुत्यामुक्त राहते.

त्वचेसाठी फायदेशीर

जर तुम्हाला आंघोळीचे तेल घ्यायचे असेल तर तूप हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला 5 चमचे तुपात 10 चमचे आवश्यक तेल मिसळावे लागेल. आंघोळ करण्यापूर्वी दोन्ही गोष्टी मिसळा आणि शरीरावर लावा आणि मऊ त्वचा मिळवा.

थकलेल्या डोळ्यांपासून मुक्त व्हा

जर तुम्ही थकलेल्या डोळ्यांच्या समस्येने त्रस्त असाल तर डोळ्यांखाली तूप वापरा. यासाठी डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर तूप लावून मसाज करा. डोळ्यांखाली नियमितपणे मालिश केल्याने डोळ्यांची त्वचा उजळेल.

चमकदार ओठ मिळवा

तुपात नैसर्गिक वंगण आहे. जे ओठांना चमकदार आणि मऊ ठेवण्यास मदत करते. रोज लावल्याने तुमचे ओठ चमकदार दिसतील.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Ghee is beneficial for eliminating the problem of dry skin)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.