Skin Care | आरोग्यासाठीच नव्हे तर, चमकदार त्वचेसाठीही लाभदायी ‘पेरूची पाने’, अशा प्रकारे करा वापर!

आपल्या सर्वांना पेरुच्या फायद्यांविषयी माहिती आहे. हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरूचे सेवन केल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा धोका कमी होतो.

Skin Care | आरोग्यासाठीच नव्हे तर, चमकदार त्वचेसाठीही लाभदायी ‘पेरूची पाने’, अशा प्रकारे करा वापर!
पेरूच्या पानांचे फायदे
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 12:22 PM

मुंबई : आपल्या सर्वांना पेरुच्या फायद्यांविषयी माहिती आहे. हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरूचे सेवन केल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. पण, तुम्हाला माहिती आहे का की, केस आणि त्वचेसाठी लाभदायी म्हणून पेरूची पाने देखील वापरली जातात. त्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत, जे त्वचेच्या संसर्गाची समस्या रोखतात. पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेच्या खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्याचे काम करतात (Guava Leaves amazing skincare benefits know how to use).

पेरूच्या पानांमध्ये पोटॅशियम, फॉलिक आम्ल असते. हे घटक आपल्या त्वचेसाठी हे सुपरफूड आहेत. जर मुरुम, पिटिकांचे डाग, पिग्मेंटेशन आणि अकाली वृद्धत्वाच्या खुणा या समस्येमुळे आपण त्रस्त असाल, तर आम्ही आपल्याला पेरू पानांचे घरगुती उपचार सांगणार आहोत. ज्याचा अवलंब करून आपण या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. चला तर, त्या उपायांबद्दल जाणून घेऊया…

ब्लॅक हेड्स

जर, आपल्याला ब्लॅक हेड्सचा त्रास होत असेल, तर पेरूची पाने बारीक पेस्ट करून चेहर्‍यावर लावावीत. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि नंतर स्क्रबप्रमाणे संपूर्ण चेहरा घासून घ्या. आठवड्यातून दोन वेळा ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास ब्लॅक हेड्सची समस्या दूर होईल.

डार्क स्पॉट्स

चेहऱ्यावरील काळ्या डागांची समस्या दूर करण्यासाठी, दररोज पेरूची पाने बारीक वाटून ती पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

अँटी-एजिंग

पेरूच्या पानांमधे असलेले अँटी-ऑक्सिडेंट वृद्धापकाळाच्या रेषा आणि फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. तसेच, ते आपल्या त्वचेचा टोन सुधारण्यासाठी देखील मदत करतात.

चमकदार त्वचा

कोरड्या व निर्जीव त्वचेपासून मुक्त होऊ इच्छित असल्यास, पेरूच्या पानांची पेस्ट चेहर्‍यावर लावा. ही पेस्ट व्यवस्थित कोरडी झाल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा (Guava Leaves amazing skincare benefits know how to use).

चमकदार केस

पेरूच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे आपले केस चमकदार बनवण्यास मदत करते. पेरूच्या पानांमध्ये व्हिटामिन बी आणि सी असते, जे स्काल्पचे खोलवर पोषण करते.

स्काल्पसाठी फायदेशीर

केसांची कोणतीही समस्या दूर करण्यासाठी स्काल्प मजबूत असणे गरजेचे असते. पेरूच्या पानांमध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे स्काल्पला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

पेरूच्या पानांचे आरोग्यदायी फायदे :

दररोज पेरूची पाने खाल्याने कोलेस्टेरॉल देखील कमी होतो. शरीरात रक्त परिसंचरण चांगले राहते. तसेच हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होतो. जर पेरुच्या पानांचा काढा डायबिटीजच्या रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी पिण्यास दिला तर, त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित होते. ज्यामुळे मधुमेहामुळे होणारे सर्व त्रास दूर होतात. हंगामी सर्दी, खोकला किंवा घसा खवखवणे अशा समस्या निर्माण होत असतील, तर पेरुच्या पानांचा रस दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावा. याने बराच आराम मिळतो.

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Guava Leaves amazing skincare benefits know how to use)

हेही वाचा :

Teeth Whitening  | दातांचा पिवळेपणा 2 मिनिटात दूर करण्यासाठी भन्नाट टिप्स!

कापूराचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत? वाचा…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.