मुंबई : त्वचेप्रमाणेच आपल्या केसांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. मात्र, सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला केसांची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे केस गळती, कोंडा, दोन तोंडी इत्यादी समस्या निर्माण होतात. केसांच्या या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये काही खास पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे आपले केस सुंदर आणि मुलायम होण्यास मदत होईल.
जवस
जवसाच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ते केस गळणे कमी करते आणि टाळू मजबूत करण्यास मदत करतात. जवस प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त देखील समृद्ध आहे.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया अनेकांना खाण्यासाठी आवडतात. ज्या केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्या जस्त, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह इत्यादीने समृद्ध आहे. लोह केसांसाठी आरोग्यदायी आहे आणि पातळ होणे आणि तुटणे टाळण्यासाठी योग्य आहे.
तीळ
तीळ काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये असतात. ते अतिशय पौष्टिक आणि जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॅटी ऍसिडस्ने भरलेले असतात. ते केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि आपल्या केसांना नैसर्गिक चमक देतात.
सूर्यफूलाच्या बिया
सूर्यफूलाच्या बिया आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यात व्हिटॅमिन ईचा एक उत्तम स्त्रोत देखील आहे आणि तुम्ही ते तुमच्या सॅलड्स किंवा स्मूदीजमध्ये मिक्स करू शकता.
चिया बिया
केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले फॅटी ऍसिडस्, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यामध्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यात लोह आणि सेलेनियम देखील असतात जे केसांचा पोत, वाढ आणि चमक सुधारतात.
संबंधित बातम्या :
दिवाळीमध्ये जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खात आहात? तर ‘ही’ खास बातमी तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Include these seeds in your diet and get beautiful hair)