Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!

उन्हाळ्याचा हंगाम येताच लोकांना बर्‍याच समस्याही येऊ लागतात. या काळात विशेषतः त्वचेशी संबंधित अनेक समस्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत, ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांचा चेहरा खूप चिकट दिसू लागतो.

Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!
तेलकट त्वचा
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 1:06 PM

मुंबई : उन्हाळ्याचा हंगाम येताच लोकांना बर्‍याच समस्याही येऊ लागतात. या काळात विशेषतः त्वचेशी संबंधित अनेक समस्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत, ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांचा चेहरा खूप चिकट दिसू लागतो. ही समस्या टाळण्यासाठी आपण काही सोप्या टिप्स अवलंबू शकता. चला तर, या टिप्स काय आहेत, ते जाणून घेऊया…(Oily skin care tips in summer season)

आठवड्यातून एकदा मातीचा फेस पॅक

कोणत्याही मास्कमधील क्ले त्वचेच्या पोर्समधून सर्व घाण आणि अतिरिक्त तेल शोषण्यास मदत करते. हे मास्क आपल्या तेलकट त्वचेच्या अति-चमकण्याच्या समस्या देखील कमी करू शकतात. यासाठी निळा लगूनचा सिल्ट मड मास्क वापरा. आपण आठवड्यातून एकदा याचा वापर करू शकता. हे पॅक लावल्यानंतर चेहरा मॉइश्चरायझर करणे विसरू नका.

मॉइश्चरायझर वापरा

हिवाळ्या प्रमाणेच उन्हाळ्यातही मॉइश्चरायझर वापरणे अतिशय आवश्यक आहे. बहुतेक मॉइश्चरायझर लावल्यानंतर शरीरातून जास्त प्रमाणात घाम बाहेर येतो. मॅटीफाइंग मॉइश्चरायझर सामान्य मॉइश्चरायझरपेक्षा खूपच हलका असतो आणि शरीरात लगेच शोषून घेतला जातो. याचा वापर केल्याने चेहरा मुलायम राहतो आणि घाम देखील येत नाही. परिणामी तो आपला चेहरा चिकट होण्यापासून प्रतिबंधित करतो.

फेस वाईप्स जवळ ठेवा

उन्हाळ्यात, आपल्या चेहऱ्यामधून मोठ्या प्रमाणात तेल बाहेर निघते आणि ते त्वचेच्या आत पुनःपुन्हा तयार होत राहते. आपल्याला आपला चेहरा स्वच्छ करण्याची फारशी संधी मिळत नाही. परंतु, अशावेळी आपण चेहरा स्वच्छ पुसून घेतल्यास आपल्या चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल आणि चिकटपणा दूर होण्यास मदत होते (Oily skin care tips in summer season).

टोनर वापरा

आपली त्वचा नेहमीच स्वच्छ ठेवण्यासाठी, स्कीन टोनरचा वापर करा. यासाठी विच हेझल बेस्ड टोनर निवडा. विच हेझेलची त्वचा कोरडे न करता चेहर्याच्या त्वचेचे तेल कमी करते. परंतु, हे लक्षात ठेवा की कधीही अल्कोहोल बेस्ड टोनर वापरू नका. आपण त्यांचा वापर केल्यास आपली त्वचा कोरडे होईल. यामुळे आपल्या त्वचेवर खाज सुटणे आणि लाल पुरळ होण्याची शक्यता वाढेल.

फेस ऑईल वापरा

उन्हाळ्यात फेस ऑईल लावणे देखील फायदेशीर ठरू शकते. चेहऱ्याची त्वचा फेस ऑईल सहज शोषून घेते. आणि आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या तेलाला संतुलित करते. हे तेल वापरल्यास त्वचेतील तेलाचे उत्पादन कमी होते.

(टीप : सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Oily skin care tips in summer season)

हेही वाचा :

Heart Disease | दैनंदिन जीवनातल्या ‘या’ गोष्टी वाढवतात हृदयविकाराचा धोका, जाणून घ्या याबद्दल…

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.