सगळ्यात आधी फेस सीरम लावावे की मॉइश्चरायझर? जाणून घ्या योग्य मार्ग
आजकाल तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी स्किनकेअर रूटीन आवश्यक झाले आहे. बरेच लोकं फॉलो देखील करत आहेत. पण काही लोकं स्किनकेअर रूटीनमध्ये त्वचेवर आधी सीरम वापरावे की मॉइश्चरायझर लावावे यात गोंधळून जातात. जर तुम्हीही याच संभ्रमात असाल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे.

आजकाल प्रत्येकजण स्किनकेअर रूटीनच्या दिनचर्येत सीरम आणि मॉइश्चरायझर दोन्ही महत्त्वाची भूमिका बजावतात. साधारणपणे प्रत्येकाला आपली त्वचा निरोगी, चमकदार आणि तरुण दिसावी असे वाटते, परंतु यासाठी योग्य स्किनकेअर प्रॉडक्ट योग्य टप्प्यात वापरणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः जेव्हा सीरम आणि मॉइश्चरायझरचा विचार केला जातो तेव्हा बरेच लोकं गोंधळून जातात की त्यांनी आधी त्वचेवर फेस सीरम लावावे की मॉइश्चरायझर?
काही लोकं तर रात्री त्वचेवर फेस सीरम लावून झोपतात. तर काही लोक त्यांच्या सकाळच्या स्किनकेअर रूटीनमध्ये सीरमचा वापर करतात. पण जर तुम्हाला देखील हाच संभ्रम असेल की आधी सीरम लावायचे की मॉइश्चरायझर लावायचे, तर आम्ही तुम्हाला आजच्या लेखात सांगणार आहोत स्किनकेअर करताना सर्वात आधी स्टेप कोणती आहे?
सीरम आणि मॉइश्चरायझरमध्ये काय फरक आहे?
फेस सीरम: सीरम हलके, लवकर शोषले जाणारे आणि सक्रिय घटकांनी समृद्ध असते. ते त्वचेत खोलवर जाते आणि त्वचेला हायड्रेट आणि पोषण देण्याचे काम करते. सीरममध्ये हायलुरोनिक अॅसिड, व्हिटॅमिन सी, रेटिनॉल आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे घटक असतात, जे त्वचेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतात.
मॉइश्चरायझर: मॉइश्चरायझर हे त्वचेच्या वरच्या लेअरवर एक संरक्षक थर तयार करतात, ज्यामुळे त्वचा ओलावा टिकून राहते. तसेच मॉइश्चरायझर त्वचेवरील कोरडेपणा येऊ देत नाही. त्यामुळे सीरममधील पोषक तत्वांना लॉक करण्यास मदत करते.
सर्वात आधी त्वचेवर सीरम लावावे की मॉइश्चरायझर?
सर्वात प्रथम त्वचेवर फेस सीरम लावा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. सीरम हलके आणि वॉटर-बेस्ड असल्याने ते त्वचेत खोलवर सहजपणे शोषले जाते. दुसरीकडे, मॉइश्चरायझर जड असते आणि ते त्वचेच्या वरच्या थरावर एक संरक्षक थर तयार करते. जर तुम्ही आधी मॉइश्चरायझर लावले तर सीरम त्वचेत योग्यरित्या शोषले जाणार नाही आणि त्याचा परिणाम कमी होईल.
सीरम आणि मॉइश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत
स्टेप 1
सर्वप्रथम चेहरा फेस वॉशने किंवा क्लींजरने स्वच्छ करा जेणेकरून चेहऱ्यावर धूळ किंवा तेल राहणार नाही. रात्री आणि सकाळी दोन्ही वेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला ही स्टेप पाळावी लागेल.
स्टेप 2
टोनर लावा (जर वापरत असाल तर) टोनर लावल्याने त्वचेचा पीएच संतुलन राखला जातो. जेणेकरून त्वचा पुढील स्किनकेअर रूटिंगसाठी तयार होते. म्हणून तुम्ही तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये टोनर देखील समाविष्ट करू शकता.
स्टेप 3
फेस सीरम लावा: सीरमचे 2-3 थेंब घ्या आणि ते त्वचेवर हलक्या हाताने सुमारे 30 सेकंदांपर्यंत त्वचेत शोषले जाईल असे हळूहळू चेहऱ्यावर चोळा.
स्टेप 4
मॉइश्चरायझर लावा: जेव्हा सीरम त्वचेत पूर्णपणे शोषले जाईल तेव्हा मॉइश्चरायझर लावा. हे त्वचेला मॉइश्चरायझ करेल आणि सीरमचे फायदे त्वचेवर होईल.
स्टेप 5
सनस्क्रीन (सकाळच्या स्किनकेअर रूटीनसाठी आवश्यक) जर तुम्ही सकाळी स्किनकेअर रूटीन करत असाल तर सनस्क्रीन ही एक अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्ही सनस्क्रीन लावावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)