मुंबई : उन्हाळा म्हटंले की, त्वचेवर (Skin) टॅन आला म्हणूनच समजा. सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे त्वचेवर टॅन जमा होतो. हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. या दरम्यान त्वचा काळी पडते. अशा परिस्थितीत त्वचेचा टॅन (Tan) दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. तुम्ही होममेड पॅक आणि स्क्रब वापरू शकता, ते तुमच्या त्वचेवरील टॅन काढण्याचे काम करतात. हे फेसपॅक (Facepack) आणि स्क्रब नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवले जातात जे तुमच्या त्वचेला खोल पोषण देतात. हे नेमके घरी कसे तयार करायचे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
कॉफी एक उत्तम एक्सफोलिएटर म्हणून काम करते. तुम्ही स्क्रब म्हणून वापरू शकता. यासाठी तुम्ही 1 चमचे कॉफीमध्ये अर्धा चमचा तेल मिसळा आणि चेहऱ्यावर आणि मानेला लावा. 5 मिनिटे मसाज करा आणि त्यानंतर ते पाण्याने धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा याचा वापर करू शकता.
बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. त्यामुळे सन टॅन कमी होतो. उकडलेले बटाटे घ्या, एका भांड्यात किसून घ्या. त्यात दोन चमचे दही, एक चमचा बेसन आणि एक चमचा मध घालून चांगले मिसळा. टॅन झालेल्या त्वचेवर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या, नंतर थंड पाण्याने धुवा,
टोमॅटोमध्ये सायट्रिक ऍसिड असते. ते त्वचा सुधारण्यास मदत करते. यासाठी एक मोठा टोमॅटो घ्या आणि तो किसून घ्या. त्यात एक चमचा साखर आणि खोबरेल तेलाचे काही थेंब घाला. चांगले मिसळा, 20 मिनिटे त्वचेवर लावा. जे थंड पाण्याने धुवा. ते आठवड्यातून 3 वेळा वापरू शकता.
पपईचे अनेक फायदे आहेत. हे व्हिटॅमिन ए, सी आणि बी सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे, ते चेहऱ्याला मॉइश्चरायझेशन ठेवते. अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी करते. काळे डाग कमी करते. पपई मॅश करा, एक चमचा पपईचा लगदा घ्या आणि मॅश करा. त्यात अर्धा चमचा बेसन आणि एक चमचा मध घालून त्वचेवर लावा, त्वचेला एक्सफोलिएट करा, 5 मिनिटे असेच राहू द्या आणि थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Watermelon : वजन कमी करण्यापासून ते दृष्टी वाढवण्यापर्यंत कलिंगड आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
Health Care : या जीवनसत्वाची कमतरता आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा हे जीवनसत्व नेमके कोणते?