AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात ओठांच्या कोरडेपणामुळे त्रस्त आहात? मग, घरच्या घरी तयार करा नारळ तेल आणि मधाचा ‘लीप मास्क’!

प्रत्येक व्यक्तीलाच गुलाबी आणि मऊ ओठ आवडतात, आपले ओठ सौंदर्यात आणखी भर घालतात.

उन्हाळ्यात ओठांच्या कोरडेपणामुळे त्रस्त आहात? मग, घरच्या घरी तयार करा नारळ तेल आणि मधाचा ‘लीप मास्क’!
ओठ
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 9:41 AM

मुंबई : प्रत्येक व्यक्तीलाच गुलाबी आणि मऊ ओठ आवडतात, आपले ओठ सौंदर्यात आणखी भर घालतात. मात्र, व्यस्त जीवनशैलीमुळे आणि योग्य ती काळजी न घेतल्यामुळे आपल्या ओठांचा रंग फिकट होऊ लागतो. याव्यतिरिक्त, हळूहळू ओठांचा नैसर्गिक ओलावा देखील कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत आपण चेहऱ्यासह ओठांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. (Tips for taking care of lips in summer)

-नारळ तेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे कार्य करते. जे त्वचा हायड्रेट ठेवण्यास तसेच ओठ मऊ ठेवण्यास मदत करते. नारळ तेल एक ते दोन चमचे घ्या आणि हे मिश्रण दिवसातून 3 ते 4 वेळा ओठांवर लावा. याचा फायदा तुमच्या ओठांना होईल.

-ओठांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण मध आणि एव्हकाडो मिसळून हायड्रेटिंग लिप मास्क तयार करू शकता. यासाठी, एका भांड्यात एक चमचा मध, 2 चमचे पिकलेले एव्हकाडो मिसळा. मात्र हे मिश्रण आपल्या आठोवर लावा. हे मिश्रण आपल्या ओठांना जास्त काळ हायड्रेट ठेवेल आणि ओठांची त्वचा फुटणार नाही.

-ओठांच्या समस्य दूर करण्यास गुलाबाच्या पाकळ्या देखील मदत करतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून, त्यात लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण झोपण्या पूर्वी ओठांवर लावा. काही दिवसांत आपली ही समस्या दूर होईल. केवळ मध लावल्याने देखील ओठांच्या समस्येतून आराम मिळतो.

-जर तुमचे ओठ कोरडे होत असतील तर ग्रीन टीची बॅग कोमट पाण्यात ठेवा आणि ती ओठांवर लावा. आपण दररोज काही मिनिटे हा उपाय करू शकता. हे लक्षात ठेवा की ग्रीन टीची बॅग जास्त गरम होणार नाही. नाहीतर यामुळे आपले ओठ खराब होऊ शकतात.

-उन्हाळ्यात काकडी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपण कोरड्या ओठांवर काकडी किसून लावावी आणि 10 ते 15 मिनिटे ठेवा. दिवसातून 1-2 वेळा हा उपाय करा. यामुळे तुमचे ओठ मऊ होतील.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Tips for taking care of lips in summer)

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....