Skin Care : चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी ‘हा’ फेसपॅक वापरा !
त्वचेवरच्या सुरकुत्या काढण्यासाठी आपण आंब्याचा फेसपॅक वापरू शकतो. ज्यामुळे आपल्या त्वचेवरील सुरकुत्या जाण्यास मदत होईल.
मुंबई : आंब्यात व्हिटॅमिन ए असते जे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला दोन चमचे गव्हाचे पीठ आणि एक चमचे मध एक चमचे आंब्याचा रस लागणार आहे, हे सर्व एकत्र चांगले मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार होईल. (Use this face pack to get rid of facial problems)
त्वचेवरच्या सुरकुत्या काढण्यासाठी आपण आंब्याचा फेसपॅक वापरू शकतो. ज्यामुळे आपल्या त्वचेवरील सुरकुत्या जाण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला चार चमचे आंब्याचा लगदा आणि तीन चमचे दूध लागणार आहे. दूध आणि आंब्याचा लगदा मिक्स करून घ्या. त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण दहा मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूह्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.
ही पेस्ट आठ दिवसातून तीन वेळा लावा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. अर्धी केळी, अर्ध लिंबू घ्या, प्रथम केळी मॅश करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये लिंबू पिळून घ्या. तयार मिश्रणाने त्वचेची मालिश 5 ते 7 मिनिटे आणि नंतर 15 मिनिटांवर ठेवा. त्यानंतर ते ताज्या पाण्याने चेहरा धुवा. आपण दररोज हे करू शकता. बटाट्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक बटाटा आणि चार चमचे मध घ्या.
सर्वात अगोदर बटाटा किसून घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट मिक्स करून बारीक करून घ्या. हा फेसपॅक एक तासांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी
चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Use this face pack to get rid of facial problems)