Skin Care Tips | नैसर्गिक ग्लो हवा आहे? मग हे फेसपॅक वापरा आणि सुंदर त्वचा मिळवा!

संत्र्याच्या पावडरच्या फेसपॅकमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्याची चमक वाढते आणि जुने डाग दूर होतात. संत्र्याच्या पावडरचा फेसपॅक घरच्या-घरी तयार करण्यासाठी आपण बेसन दोन चमचे, संत्रीची पावडर एक चमचा आणि गुलाब पाणी लागेल. वरील सर्व घटक एकत्र मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा.

Skin Care Tips | नैसर्गिक ग्लो हवा आहे? मग हे फेसपॅक वापरा आणि सुंदर त्वचा मिळवा!
Image Credit source: unsplash.com
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 11:48 AM

मुंबई : उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशामुळे टॅनिंगची (Tanning) प्रमुख समस्या निर्माण होते. त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु अनेक वेळा बाजारातील उत्पादने जास्त किंमतीची असूनही म्हणावे तसे रिझल्ट अजिबात मिळत नाहीत. त्यामुळे त्वचेवर अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसू लागतात. जर तुम्हालाही अशी समस्या (Problem) असेल तर जाणून घ्या होममेड फेस पावडरबद्दल. यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होत टॅनिंगची ही समस्या दूर होण्यास मदत होते. तुम्ही संत्र्याच्या सालीच्या मदतीने घराच्या घरी सहज तयार करू शकता. हे तुमच्या चेहऱ्याच्या (Face) सर्व समस्या दूर करते आणि त्वचेचा रंग चांगला करण्यास मदत करते. चला तर मग याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

संत्र्याची साल आणि मुलतानी माती

संत्र्याच्या सालीची फेस पावडर घरी सहज तयार करता येते. यासाठी तुम्ही संत्र्याची साले वाळवून घ्या. तसेच गुलाबाची पाने सुकवून घ्या. दोन्ही बारीक करून पावडर बनवा. जेव्हा जेव्हा वापरायचे असेल तेव्हा दोन चमचे ही पावडर घ्या, एक छोटा चमचा मुलतानी माती घ्या आणि चिमूटभर हळद घाला. त्यात आवश्यकतेनुसार गुलाब पाणी मिक्स करून टाका. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. यानंतर पाणी घेऊन चेहऱ्यावर हलक्या हातांनी मसाज करा. 3 ते 5 मिनिटे मसाज करा, त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

हे सुद्धा वाचा

संत्र्याची साल आणि गुलाब पाणी

संत्र्याच्या पावडरच्या फेसपॅकमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्याची चमक वाढते आणि जुने डाग दूर होतात. संत्र्याच्या पावडरचा फेसपॅक घरच्या-घरी तयार करण्यासाठी आपण बेसन दोन चमचे, संत्रीची पावडर एक चमचा आणि गुलाब पाणी लागेल. वरील सर्व घटक एकत्र मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. त्यानंतर वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

संत्र्याची साल आणि बेसन पीठ

संत्र्याच्या पावडरमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. याच्या वापराने चेहऱ्यावरील इन्फेक्शनची समस्या दूर होते. संत्र्याच्या पावडरमध्ये व्हिटॅमिन सी असते, ते त्वचेवर नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते. ते लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषांची समस्या देखील दूर होते. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर अशावेळी आपण सरळ संत्र्याच्या सालीची पावडर गुलाब पाण्यामध्ये मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. दहा मिनिटांनंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.