AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यापासून डोळ्यांसाठी गुणकारी धणे पाणी, जाणून घ्या याचे अनेक फायदे

धण्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम आढळतात आणि हे सर्व घटक रोगांपासून दूर ठेवतात. (Benefits of coriander water for weight loss to eye issues, know more about it)

वजन कमी करण्यापासून डोळ्यांसाठी गुणकारी धणे पाणी, जाणून घ्या याचे अनेक फायदे
वजन कमी करण्यापासून डोळ्यांसाठी गुणकारी धणे पाणी
| Edited By: | Updated on: May 09, 2021 | 7:30 AM
Share

नवी दिल्ली : प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले धणे केवळ अन्नालाच चवदार बनवत नाही तर याचे अनेक फायदे आहेत. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक लाभ मिळतात. धणे शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे अ, सी जीवनसत्वासह पुष्कळ पोषक तत्वांचा पुरवठा करते. हेच कारण आहे की आरोग्य तज्ज्ञ हे हर्बल टी, डेकोक्शन इत्यादी स्वरूपात वापरण्याचा सल्ला देतात. धण्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम आढळतात आणि हे सर्व घटक रोगांपासून दूर ठेवतात. अलिकडेच आयुष मंत्रालयानेही कोविड -19 गाईडलाईनमध्ये आरोग्य लाभ म्हणून त्यास खाद्यपदार्थामध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश जारी केले आहेत. (Benefits of coriander water for weight loss to eye issues, know more about it)

असे तयार करा धणे पाणी

– एका पात्रात एक ग्लास पाणी घ्या आणि गॅसवर उकळा. – हे पाणी उकळण्यास सुरवात झाल्यावर त्यात एक चमचा धणे घाला. – अर्धे पाणी कमी होईपर्यंत उकळी येऊ द्या. – हे पाणी गाळून चहासारखे गरम गरम प्या.

धणे पाण्याचे फायदे

– धण्याचे पाणी पचनक्रियेच्या समस्या दूर करते. – पोटात गॅस, जळजळ होण्याची समस्या दूर करते. – हे शरीरात चयापचय प्रक्रियेस गती देते. – हे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. – थायरॉईड हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी देखील हे प्रभावी आहे. – याच्या वापरामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी केली जाऊ शकते. – यामुळे सांध्यातील वेदना कमी होण्यास मदत होते. – हे शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही. – हे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करते. – याच्या मदतीने आपण मूत्रपिंड डिटॉक्स करू शकता. – उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवते आणि उष्णता दूर करण्यासाठी देखील कार्य करते. – चेहऱ्यावर सूज सारख्या तक्रारींचा त्रासही दूर होतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

धणे डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहेत. धणे पाण्यात उकळवा. हे पाणी थंड झाल्यावर जाड कपड्याने चाळणी करुन याचे दोन थेंब डोळ्यात घातल्याने जळजळ, वेदना, डोळ्यातून पाणी येण्यासारख्या समस्या दूर होतात. (Benefits of coriander water for weight loss to eye issues, know more about it)

इतर बातम्या

Team India | संघात स्थान हवंय? आधी वजन कमी कर, बीसीसीआयचा ‘या’ स्टार खेळाडूला सल्ला

घर बसल्या पैसे काढण्याबरोबरच जमा करण्याची ‘या’ बँकांकडून सुविधा, जाणून घ्या कसा मिळवाल लाभ

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.