थंडीत तीळ खा, हाडं मजबूत करा ! 5 मोठे फायदे !
तिळातील ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक असतात
मुंबई : हिवाळ्यात आहारामध्ये तिळाचं तेल वापरण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. गोडाधोडाचे पदार्थ किंवा डेझर्टचा स्वाद वाढवण्यासाठीही तिळाचा वापर केला जातो. थंडीच्या दिवसात तीळ खाणं अत्यंत आरोग्यदायी आहे. तिळातील पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक असतात. तिळाचे हृदयापासून त्वचेपर्यंत कुठकुठले फायदे आहेत, हे जाणून घेऊया (Benefits of eating sesame in winter food lifestyle)
हृदयविकाराशी संबंधित आजारांपासून दूर राहा
तिळातील मोनो सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात. त्यामुळे हृदयाशी निगडित आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. तिळामुळे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते. त्यामुळे तिळाचे नियमित सेवन करणे गुणकारी ठरते.
हृदयाचे स्नायू तंदुरुस्त राखा
तिळात आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम यासारखे घटक असतात. त्यामुळे हृदयाचे स्नायू सक्रिय राहण्यास मदत होते.
हाडे मजबूत करा
तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही. दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचाभर तीळ खाल्लेत, तर तुमचे दातही मजबूत होतील. तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते.
आजारांपासून सुटका
तिळात सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास अवरोध होतो. त्यामुळे फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन, रक्त (ल्युकेमिया) यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी करतात. याशिवायही तीळ बहुगुणी आहे.
तणावापासून मुक्ती मिळवा
आजकाल धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात. तीळाच्या सेवनाने तुमच्या मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते. लिपोफोलिक अँटीऑक्सिडंटमुळे वयवाढीचा मेंदूवर परिणाम होत नाही. (Benefits of eating sesame in winter food lifestyle)
वयोमानाप्रमाणे स्मरणशक्ती कमजोर होते. तुम्ही रोज तीळ किंवा तिळापासून तयार केलेले पदार्थ खाल्लेत, तर त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम जाणवतो. तिळाचे तेल त्वचेसाठीही उपयुक्त असते. त्वचेचं पोषण होऊन ओलावा कायम राखण्यास मदत होते.
Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!https://t.co/Znr5WfzLhp#Winter #diet #Food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
संबंधित बातम्या :
फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळताय, फायद्यांपेक्षा तोटे जास्त!
वजन घटवायचंय? मग मशरुम ट्राय करता?
(Benefits of eating sesame in winter food lifestyle)