Skin Care | त्वचेचेही असतात वेगवेगळे प्रकार, जाणून घ्या कोणता घरगुती स्क्रब ठरेल अधिक फायदेशीर!

स्क्रब केल्याने मृत त्वचा निघून जाते. यासह, चेहर्‍याची चमक देखील परत येते. आपण इच्छित असल्यास, घरच्या घरी देखील स्क्रबिंग करू शकता. (Home made scrub skin)

Skin Care | त्वचेचेही असतात वेगवेगळे प्रकार, जाणून घ्या कोणता घरगुती स्क्रब ठरेल अधिक फायदेशीर!
स्क्रब
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 12:40 PM

मुंबई : धूळ, माती आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेच्या पोर्समध्ये घाण जमा होते आणि हळूहळू मृत त्वचेचा थर चेहऱ्यावर तयार होतो. यामुळे आपला चेहरा नैसर्गिक चमक गमावू लागतो. अशा परिस्थितीत चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी नियमित स्क्रब करणे फार महत्वाचे आहे. त्वचेवरील मृत त्वचेचा थर काढून टाकल्याने आपल्या त्वचेची नैसर्गिक चमक परत येते. यासाठी, जर आपण स्क्रबिंगचा विचार करत असाल, तर आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार स्क्रबची निवड करा (Best Home made scrub as per skin type for glowing skin).

स्क्रब केल्याने मृत त्वचा निघून जाते. यासह, चेहर्‍याची चमक देखील परत येते. आपण इच्छित असल्यास, घरच्या घरी देखील स्क्रबिंग करू शकता. आम्ही तुम्हाला त्वचेच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार स्क्रब रेसिपी सांगणार आहोत, ज्या आपण सहज घरात ट्राय करू शकता. चला तर, जाणून घेऊया या घरगुती स्क्रबबद्दल…

कोरडी त्वचा

जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर तुम्ही अशा गोष्टी वापरल्या पाहिजेत ज्यामुळे तुमचा चेहरा मॉइश्चराइझ होऊ शकेल. हा स्क्रब तयार करण्यासाठी, एक चमचा कॉफी पावडरमध्ये अर्धा चमचा मध, शुद्ध तूप आणि पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट लावल्यानंतर हलक्या हातांनी हळूहळू 4 ते 5 मिनिटांसाठी मसाज करा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

सामान्य त्वचा

जर आपली त्वचा सामान्य असेल, तर आपण कोणत्याही प्रकारचे स्क्रब वापरू शकता. आशा वेळी आपल्या चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी ब्राऊन शुगर आणि ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार हे स्क्रब सर्वोत्तम असेल. या दोन गोष्टी मिसळा आणि त्याची पेस्ट बनवा. या पेस्टने चेहऱ्यावर हलके मसाज करा. त्यातील साखर त्वचेचे पोर्स साफ करेल आणि तेल चेहर्‍याची चमक परत आणेल. काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवा (Best Home made scrub as per skin type for glowing skin).

तेलकट त्वचा

तेलकट त्वचा असलेल्या लोकांना जास्त प्रमाणात स्क्रब करण्याची आवश्यकता नसते. परंतु चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रब करणे फायदेशीर आहे. जर, तेलकट त्वचा असेल तर दही, ओट्स आणि मध यांची जाडसर पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर आणि मानेवर लावा आणि 10 मिनिटे तशीच राहु द्या. यानंतर, हलक्या हाताने किंवा बोटांनी चेहरा स्क्रब करा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

संवेदनशील त्वचा

संवेदनशील त्वचेला विशेष काळजी आवश्यक आहे. कारण, अशा त्वचेला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते, ते स्क्रबिंग टाळतात. आपल्या त्वचेवर मृत त्वचा असल्यास, ती काढून टाकण्यासाठी सौम्य स्क्रब करता येतो. सौम्य स्क्रबसाठी, पिठाच्या कोंड्यामध्ये कोरफड जेल आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावल्यानंतर हलक्या हाताने मालिश करा. थोड्या वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Best Home made scrub as per skin type for glowing skin)

हेही वाचा :

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....