Weight Loss: वजन कमी करायचे असेल तर अवलंबवा ‘हा’ उपाय

राष्ट्रीय स्तरावर महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण 21 टक्क्यांवरून वाढून 24 टक्के तर पुरूषांमध्ये 19 टक्क्यांवरून वाढून 23 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

Weight Loss: वजन कमी करायचे असेल तर अवलंबवा 'हा' उपाय
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 5:50 PM

नवी दिल्ली – आजच्या काळात वाढलेले वजन किंवा लठ्ठपणा (obesity) ही लोकांसाठी मोठी समस्या बनत चालली आहे. तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल किंवा लठ्ठपणा (weight loss) कमी करायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. यासाठी तुम्हाला जेवण सोडण्याची किंवा उपाशी राहण्याची गरज नाही. कारण वजन कमी करण्याचा अर्थ स्वतःला एखादा पदार्थ खाण्यापासून थांबवणे, असा होत नाही. त्याऐवजी काय खावे, किती खावे आणि कधी खावे, याचे नीट व्यवस्थापन (food management) करणे महत्वाचे ठरते. जर तुम्ही तुमच्या आवडत्या पदार्थांशिवाय राहू शकत नसाल तर थोड्या-थोड्या वेळावे तीन ते चार वेळा खावे. यामुळे जेवण लवकर पचतं आणि तुमच वजनही वाढणार नाही.

वजन कमी करण्यासाठी या पदार्थांचा करा आहारात समावेश

सँडविच

हे सुद्धा वाचा

भरपूर पनीरयुक्त सँडविच खाण्यापेक्षा थोडेसे आणि हेल्दी पदार्थ असलेले सँडविच खावे. सँडविचसाठी होल व्हीट किंवा मल्टीग्रेन ब्रेडची निवड करावी. तसेच त्यामध्ये श्रेडेड चिकन, पनीर, लेट्यूस, ब्रोकोली, टोमॅटो, काकडी यासारख्या पदार्थांचा व भाज्यांचा समावेश करावा.

फळं

फळं हा छोट्या जेवणाचा सर्वोत्तम पर्याय आहे आणि तुम्ही ती दिवसातून अनेक वेळा खाऊ शकता. प्रत्येक जेवणाच्या दरम्यान एक फळ खाल्ल्याने तुम्ही एकाच वेळी हायड्रेटेडही राहता आणि तुमचं पोटही भरतं. बहुतेक फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करतात.

स्प्राउट्स

वजन कमी करताना तुम्ही स्प्राउट्सचा पर्यायही निवडू शकता. मोड आलेले मूग हे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहेत, कारण त्यात हाय फायबर आणि आवश्यक ते पोषक घटक असतात, जे फॅट बर्न करण्यास प्रोत्साहन देतात. त्यामध्ये तुम्ही थोडं गुलाबी मीठ, काळी मिरी पावडर आणि थोडे काजू घालून ही डिश पौष्टिक आणि चविष्टही बनवू शकता.

टोस्ट आणि ऑम्लेट

जेव्हा तुम्हाला झटपट नाश्ता हवा असेल तेव्हा तुम्ही कुरकुरीत टोस्टचा पर्याय निवडू शकता. छोटं जेवण म्हणून तुम्ही ऑम्लेट टोस्ट किंवा सोबत ॲव्होकॅडो टोस्ट खाऊ शकता. आणि मुख्य म्हणजे तुम्ही हे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी खाऊ शकता. फक्त अंड खाताना त्यातील पिवळा बलक वगळावा.

ग्रीक योगर्ट फ्रूट, नट्स आणि बिया

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीक योगर्टचा पर्याय उत्तम आहे. ते खूप चविष्टही असते. त्यामध्ये तुम्ही काही नट्स, ड्रायफ्रुट्स आणि खायच्या बिया घालून ते पौष्टिकही बनवू शकता.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.